पुणे : दहाव्या मजल्यावरून उडी मारून उच्चशिक्षित (Educated) महिलेने आत्महत्या (Suicide) केली आहे. मानसी यादव (वय 27, मूळ रा. मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घटस्फोट (Divorce) देण्याची मागणी करणाऱ्या पती, सासू, सासऱ्याच्या छळामुळे महिलेने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. आत्महत्या करणारी महिला पुण्यात शिक्षणासाठी आली होती. दरम्यान, आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी पती, सासू, सासरे तसेच तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती, सासू-सासरे आणि ‘लिव्ह-इन’मधील मित्रांच्या त्रासाला कंटाळून या 27 वर्षीय विवाहित तरुणीने दहाव्या मजल्यावरून उडी मारली. याआधी तिने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तिला नागरिकांनी वाचविले. तसेच घरी आणून सोडले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मानसी भूपेंद्र यादव (वय 27) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मित्र शिरीष नरेंद्र शहा (वय 33, रा. मांजरी) याला अटक केली आहे. पती भूपेंद्र मुलायमसिंग यादव (वय 30), सासरे मुलायम सिंग यादव (वय 52) आणि सासू राजकुमारी मुलायमसिंग यादव (वय 50) यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी यादव हिचे भूपेंद्र यादव याच्यासोबत लग्न झाले होते. पती, सासू सासरे हे सर्व मध्य प्रदेशात राहतात. तर मानसी यादव ही उच्च शिक्षणासाठी खराडी येथील ईनयांग सोसायटीमध्ये राहत होती. तिची रियल इस्टेट एजंट असलेल्या शिरीष शहा याच्यासोबत ओळख झाली. ते दोघे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पती आणि सासू सासरे तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करत होते. शिरीषदेखील ती विवाहित असल्याचे माहीत असून लग्नासाठी सतत वाद घालत होता. तसेच तिच्याकडे पैशाचीही मागणी करत होता.
एकीकडे पती, सासू-सासरे आणि दुसरीकडे लिव्ह-इनमधील मित्र शिरीष यांच्या त्रासाला कंटाळून मानसीने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तिला नागरिकांनी वाचविले. तसेच, घरी आणून सोडले होते. त्यानंतर आता तिने दहा मजल्यावरून उडीमारून आत्महत्या केली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे तपास करीत आहेत.