Pune Heat : उकाड्यानं उडवली पुणेकरांची झोप! काय सांगतायत वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ? वाचा…

झोपेसाठी कार्यक्षम थर्मोरेग्युलेशन महत्त्वाचे आहे, जसे वातावरणीय तापमान असते, त्यामुळे तापमान थंड असताना, म्हणजेच सूर्यास्तानंतर मनुष्य झोपेकडे जैविकदृष्ट्या प्रवृत्त असतो. बाहेरील उच्च तापमानामुळे शरीराला थंडावा मिळणे आणि चांगली झोप घेणे कठीण होते.

Pune Heat : उकाड्यानं उडवली पुणेकरांची झोप! काय सांगतायत वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ? वाचा...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 7:30 AM

पुणे : सध्या पुण्यात ढगाळ (Cloudy) वातावरण असले तरी मागच्या काही दिवसांपासूनच्या उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. उष्णतेच्या (Heat) या लाटेने अनेकांच्या झोपेचे वेळापत्रक बिघडवले आहे. त्यामुळे अनेकांना झोप लागणे कठीण झाले आहे. मला सुस्त पण अस्वस्थ वाटते. दिवसभरात थोडीशी गैरसोय झाली तरी मला चिडचिड होते. हे सर्व उष्णतेमुळे होत असून मला रात्री नीट झोप येत नाही, अशा तक्रारी पुणेकर करत आहेत. अनेक भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने आणि सूर्यास्तानंतरही उकाडा फारसा कमी होत नसल्याने अनेक नागरिकांची रात्रीची शांत झोप (Sleep) उडाली आहे. किती तास झोप होते, यापेक्षा किती शांत झोप लागते, हे महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे एकूणच काय वातावरणात गारवा येईपर्यंत पुणेकरांची झोप हा उन्हाळा उडवत राहणार असे दिसत आहे.

उष्णतेचा परिणाम

काही लोकांना तीव्र उष्णतेमुळे काही आठवडे नीट झोप लागली नाही. रात्रभर डोळे मिटून अंथरुणावर पडणे, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर लोळणे असे प्रकार होत असतात. यामुळे झोप कमी होऊ शकते. अनेकांनी झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार केली आहे, अनेक वेळा त्यांना मध्येच जाग आली आहे. प्रौढ लोक त्यांच्या झोपेच्या कालावधीपैकी फक्त 20-25% रॅपिड आय मूव्हमेंट (REM) सायकलमध्ये घालवतात, परंतु शांत अवस्थेत जाणे विशेषतः उष्णतेमुळे कठीण झाले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जड खाणे टाळा

झोपेसाठी कार्यक्षम थर्मोरेग्युलेशन महत्त्वाचे आहे, जसे वातावरणीय तापमान असते, त्यामुळे तापमान थंड असताना, म्हणजेच सूर्यास्तानंतर मनुष्य झोपेकडे जैविकदृष्ट्या प्रवृत्त असतो. बाहेरील उच्च तापमानामुळे शरीराला थंडावा मिळणे आणि चांगली झोप घेणे कठीण होते. अनेकांसाठी एअर कंडिशनिंग हा एक उपाय आहे. वैद्यकीय तज्ज्ञ रात्रीच्या वेळी तेलकट आणि जड जेवणाचा अतिरेक न करण्याचा सल्ला देतात, हायड्रेटेड राहा ज्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होईल आणि सैल कपडे घालावे त्याबरोबरच सुती पांघरूण असावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

गंभीर आजारही होण्याची शक्यता

झोप कमी झाल्यास त्याचा परिणाम थेट कामावर होत असतो. गोंधळून जाणे, चिडचिड होणे, कामवासना कमी होणे या काही समस्या झोपेच्या कमतरतेमुळे उद्भवतात. परंतु यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, उच्च रक्तदाब, पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटका यासारख्या गंभीर गुंतागुंतीदेखील होऊ शकतात, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.