Pune accident : बारामतीच्या नेपतवळणजवळ ऊसतोडणी मजुरांच्या ट्रॉलीला आयशर टेम्पोची धडक; सात मजुरांसह नऊ जण गंभीर

पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास बारामती (Baramati) मोरगाव रस्त्यावरील नेपतवळण येथे पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. यात सात मजुरांसह तब्बल नऊजण गंभीर जखमी झाले आहेत.

Pune accident : बारामतीच्या नेपतवळणजवळ ऊसतोडणी मजुरांच्या ट्रॉलीला आयशर टेम्पोची धडक; सात मजुरांसह नऊ जण गंभीर
अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करतानाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 1:37 PM

बारामती, पुणे : ऊस तोडणीसाठी निघालेल्या मजुरांच्या ट्रॉलीला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिली आहे. या अपघातात सात मजुरांसह नऊ जण गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत. याप्रकरणी बारामती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बारामती मोरगाव रस्त्यावर नेपतवळणजवळ पावणेपाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात (Accident) झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोडणी मजूर आपल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून ऊस तोडणीसाठी जात होते. पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास बारामती (Baramati) मोरगाव रस्त्यावरील नेपतवळण येथे पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. यात सात मजुरांसह तब्बल नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आता गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या भीषण अपघातात वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

जखमींना रुग्णालयात केले दाखल

या अपघातात एकनाथ गर्दाळ चव्हाण, हिराबाई एकनाथ चव्हाण, भाऊसाहेब एकनाथ चव्हाण, बाजीराव तुकाराम जाधव, मंजुळा बाजीराव जाधव, अशोक एकनाथ चव्हाण, अंजू अशोक चव्हाण, रवींद्र बाजीराव जाधव (4 वर्ष), राधा बाजीराव जाधव (दीड वर्षे), इम्तियाज मलिक (चालक), साहिल मलिक हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा :

Shankarrao Gadakh : मंत्री शंकरराव गडाख यांना मुलासह जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

Pune crime : पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरच्या अवैध धंद्यांवर पोलिसांची धाड; मद्य अन् गुटख्यासह वाहनही जप्त

Beed : बीडमध्ये एसटी आणि खासगी बसवर दगडफेक! रस्त्यावर टायर जाळून दगडफेकीच्या घटनेनं खळबळ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.