गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं, 2 मे रोजी मतदान

राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने आज या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार गोकुळसाठी 2 मे रोजी मतदान पार पडणार आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं, 2 मे रोजी मतदान
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 8:03 PM

कोल्हापूर : जिल्ह्याचं आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने आज या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार गोकुळसाठी 2 मे रोजी मतदान पार पडणार आहे. 22 मार्च रोजीच निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी प्राधिकरणाकडे हा कार्यक्रम पाठवला होता.(Election program of Gokul Dudh Sangh in Kolhapur announced)

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

25 मार्च ते 1 एप्रिल – उमेदवारी अर्ज भरणे 5 एप्रिल – उमेदवारी अर्जाची छाननी 6 एप्रिल – वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे 6 ते 20 एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी 22 एप्रिल – उमेदवारांना चिन्हांचे वाटप 2 मे – मतदान 4 मे – मतमोजणी

गोकुळच्या निवडणुकीची घोषणा होताच आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. 22 मार्च म्हणजे कालच विरोधी शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलीय. तर सत्ताधारी आघाडीनंही बैठकांवर जोर दिल्याचं पाहायला मिळत आहे.

सतेज पाटलांचा सत्ताधारी आघाडीला दणका

सत्ताधारी आघाडीला दणका देत पालकमंत्री सतेज पाटील यांनी अनेक संचालकांना विरोधी आघाडीत सहभागी करुन घेतलं आहे. सतेज पाटील यांच्यासह ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि खासदार संजय मंडलिक हे एकवटले आहेत. त्यांनी सोमवारी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा केली. ही आघाडीच सत्तेवर येणार असा दावाही सजेत पाटलांनी केला आहे. गोकुळ दूध संघावर संध्या माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता आहे. महाडिक हे भाजप तर पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत आहेत.

यंदाच्या निवडणुकीत मातब्बर चेहरे निवडणूक लढवू इच्छित आहेत. त्यातच सत्ताधारी गटाचे 6 संचालक विरोधी आघाडीकडे गेले आहेत. त्यामुळे यंदा दोन्ही पॅनलचे उमेदवार कोण असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे दोन्ही पॅनेलकडून उमेदवारांची घोषणा अर्ज माघारीच्या दिवशीच होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

‘गोकुळ’च्या वार्षिक सभेपूर्वी प्रशासनाचंही ठरलंय, सर्व खुर्च्यांना बांधून ठेवलंय!

‘गोकुळ’ मल्टीस्टेटला कर्नाटकने NOC नाकारली, लढा जिंकला : सतेज पाटील

Election program of Gokul Dudh Sangh in Kolhapur announced

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.