Election : पुण्यातल्या भोरच्या राजगड सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, वाचा सविस्तर

17 संचालक निवडीसाठी हा निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. 29 मेला यासाठी मतदान होणार आहे. तर 31 मेला मतमोजणी आणि निकाल घोषित करण्यात येणार आहे.

Election : पुण्यातल्या भोरच्या राजगड सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, वाचा सविस्तर
राजगड सहकारी साखर कारखानाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 9:38 AM

पुणे : पुण्यातील भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याची (Rajgad sahakari sakhar karkhana) संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 2022-27 हा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे. 17 संचालक निवडीसाठी हा निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. 29 मेला यासाठी मतदान होणार आहे. तर 31 मेला मतमोजणी आणि निकाल घोषित करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी भोर यांच्या कार्यालयात 25 ते 29 एप्रिल या काळात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत फक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मिळणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज (Application) शुल्क 100 रुपये भरावे लागणार आहे. खुल्या आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांना 2 हजार रुपये, अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना 500 रुपये इतकी निवडणूक अनामत जमा करावी लागेल.

छाननी 2 मेला

मिळालेल्या नामनिर्देशनपत्रांची यादी त्या त्या दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याची छाननी 2 मेला सकाळी 11 वाजल्यापासून प्रसिद्ध करण्यात येईल. जे नामनिर्देशन पत्र ग्राह्य होतील, त्याची यादी 4 मेला निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी भोर विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

5 ते 18 मे काळात मागे घेता येणार नामनिर्देशन पत्र

उमेदवारांना नामनिर्देशनपत्र 5 ते 18 मे या काळात मागे घेता येतील. निवडणूक चिन्हाचे वाटप 19 मेला होणार आहे. मतदान 29 मेला होऊन मतमोजणी आणि निकाल 31 मेला घोषित करण्यात येईल.

आणखी वाचा :

Raju Shetty : नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी घेतला खरपूस समाचार, म्हणाले व्वा! गडकरी साहेब

Pune : कामावरुन काढल्याचा राग, मृत्यूचं कारण ठरली भयंकर आग! टेलरनं मालकिणीला पेटवलं, दोघेही ठार

Pune : पुण्यात किसानपुत्रांचा आसूड कडाडणार; शेतकऱ्यांसाठी विषारी साप ठरलेल्या कायद्यांविरोधात एल्गार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.