पुणे : पुणे स्टेशन परिसरात पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) सेवा सुरू झाली आहे. पुणे रेल्वे विभागाने पुणे रेल्वे स्थानकावर बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची सेवा पुन्हा सुरू केली आहे. आरामदायी आणि त्रासमुक्त प्रवास करण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. डिव्हिजनने शारीरिकदृष्ट्या विकलांगांसाठी दोन पूर्णपणे स्वयंचलित व्हीलचेअर सादर करण्याची योजना आखली आहे, जी सहजपणे लिफ्टच्या पायऱ्यांमध्ये जाऊ शकतात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही इलेक्ट्रिक वाहने मोडकळीस आली असून गेल्या तीन वर्षांपासून त्यांची देखभाल करण्यात आलेली नाही. प्रवाशांच्या मागणीनंतर पुणे रेल्वे स्टेशनवर (Pune railway station) ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनाची सेवा वृद्ध, गर्भवती महिला आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग (Disabled) व्यक्तींसाठी आहे.
आम्ही सेवा पुन्हा सुरू केली असून प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. एस्केलेटरवर चालवता येतील अशा दोन स्वयंचलित व्हीलचेअर्स घेण्याची आमची योजना आहे. हे CSRद्वारे केले जाईल, असे पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) रेणू शर्मा यांनी सांगितले. जून 2019मध्ये CSRद्वारे आणलेल्या दोन इलेक्ट्रिक वाहनांनी प्रवाशांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर नेले. दरम्यान, देखभालीचा अभाव आणि कोविडच्या साथीच्या काळात ते अकार्यक्षम झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोविडच्या काळात ही सेवा बंद झाली होती. तेव्हा या वाहनांचा वापर अक्षरश: झोपण्यासाठी होत होता. प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होत होती. मी अनेकदा माझ्या वृद्ध आई-वडिलांसोबत पुणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतो. माझ्या आईला चालता येत नाही आणि प्लॅटफॉर्मवर पोहोचायला खूप वेळ लागतो. जर ही इलेक्ट्रिक वाहने कार्यान्वित झाली तर आम्हाला आमच्या वृद्ध आई-वडिलांना प्लॅटफॉर्मच्या एका बाजूवरून दुसर्या बाजूला नेणे सोपे होईल, अशी एका प्रवाशाने आपली प्रतिक्रिया दिली होती.