Pune Power outage | पुण्यातील निम्म्या भागातील वीज अद्यापही गायब ; नागरिकांना करावा लागतोय गैरसोईचा सामना
पुण्यासह, पिंपरी चिंचवडमधील वीज पुरवठा खंडित झाला होता.तब्बल सहा तासांच्या खंडानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील काही भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.मात्र अद्यापही शहरातील मोठा भागात अद्यापही वीज नसल्याचे समोर आले आहे. सकाळी 11.15 वाजेपर्यंत कल्याणीनगर, धायरी , वणवडी , हिंजवडीतील भूमकर चौक परिसर, खराडी अशा काही भागांत पुरवठा पूर्ववत झाला आहे.
पुणे – पिंपरी चिंचवडमधील महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये 5 ठिकाणी सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. त्यामुळे पुण्यातील कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी व चिंचवड (Pune and Pimpri Chinchwad)शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरातील वीज पुरवठा खंडित (Power outage) झाल्याचे समोर आले . त्यानंतर टॉवर लाईनमध्ये बिघाड झाल्याची शक्यता महापारेषणकडून व्यक्त करत, टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करीत असल्याची माहिती देण्यात आली. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो. सकाळी 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले होते. मात्र दुपारी साडेबारानंतरही केवळ काही भागातील वीज पुरवठा (Power supply restored)सुरु झाल्याचे समोर आहे.
या भागातील वीज पुरवठा पूर्ववत
पुण्यासह, पिंपरी चिंचवडमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. तब्बल सहा तासांच्या खंडानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील काही भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.मात्र अद्यापही शहरातील मोठा भागात अद्यापही वीज नसल्याचे समोर आले आहे. सकाळी 11.15 वाजेपर्यंत कल्याणीनगर, धायरी , वणवडी , हिंजवडीतील भूमकर चौक परिसर, खराडी अशा काही भागांत पुरवठा पूर्ववत झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे वॉटर पंपिंग स्टेशन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि इलेक्ट्रिक स्मशानभूमी यासारख्या सर्व विद्युतीय सुविधा बंद झाल्यानं नागरिकांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागला.
महावितरणाचे प्रयत्न सुरु
काही भागातील वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर झाल्यानंतर एमएसईटीसीएलने जलशुद्धीकरण केंद्राला प्राधान्य दिले आहे. पुढील काही तासांत इतर सर्व सुविधांमधील वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होईल, अशी आमची अपेक्षा आहे.अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील मनीषा शेकटकर यांनी दिली आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. पुढील दीड तासात संपूर्ण शहरातील वीज पुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात बत्ती गुल होण्याचं कारण काय? उत्तर इथं मिळेल!
यामी गौतमच्या ‘A Thursday’ चित्रपटाचा टीझर आऊट, शेअर करत म्हणाली…