Elon Musk’s Twitter friend from Pune : पुण्यातील अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याचे ट्विटरवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. एलन मस्क यांच्याशीही तो सहजपणे संवाद साधतो. अब्जाधीशांचा ‘ट्विटर मित्र’ म्हणूनही तो ओळखला जातो. त्याचे नाव आहे प्रणय पाथोळे (Pranay Pathole). चार वर्षांपूर्वी 23 वर्षीय पुणेस्थित सॉफ्टवेअर (Software) व्यावसायिक प्रणय पाथोळे जो त्यावेळी अभियांत्रिकीचा (Engineering) विद्यार्थी होता, त्याचे रोल मॉडेल टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी स्वयंचलित विंडस्क्रीन वायपर्सवरील त्याच्या ट्विटला उत्तर दिल्यानंतर क्लाउड नाइनवर होते. तेव्हापासून पाथोळे जो आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करतो, तो ट्विटरद्वारे थेट संदेशांद्वारे (DMs) मस्क यांच्या नियमित संपर्कात आहे. मस्क यांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळण्याची त्याची इच्छा आहे.
मला मस्क यांच्याबद्दल खूप आकर्षण वाटले, म्हणून मी त्यांना तांत्रिक गोष्टींबद्दल ट्विट करायचो. 2018मध्ये, मी त्यांना काही ऑटो वायपर सेन्सरबद्दल ट्विट केले होते, जे पाण्याचे थेंब पडल्यानंतर ते ओळखून काम करण्यास सुरवात करेल. काही मिनिटांतच, मस्क यांनी प्रतिक्रिया दिली, की ते फीचर पुढील अपडेटमध्ये (त्यांच्या कंपनीने उत्पादित केलेल्या वाहनांच्या) लागू केले जात आहे, रुपेशने सांगितले.
आपल्या अलीकडच्या ट्विटमध्ये, प्रणयने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आव्हान दिल्याबद्दल टेस्ला सीईओंचा बचाव केला आणि लिहिले, “लोक @elonmusk विरुद्ध द्वेष का पसरवत आहेत? युक्रेनला स्टारलिंक इंटरनेट सेवा देऊन ते प्रत्यक्षात फरक करत आहेत, त्याचवेळी रशियन सैन्याला ट्रोल करत आहेत. मला ते खरोखर आवडते. ते पुतीन यांची सार्वजनिकपणे कशी खिल्ली उडवत आहे हे आनंददायक आहे.”
Why are people spreading hate against @elonmusk? He’s actually making a difference by providing Starlink Internet service to Ukraine, while at the same time trolling the Russian military. I really love it. It’s hilarious how he is publicly ridiculing Putin. pic.twitter.com/c3qvJiz49U
— Pranay Pathole (@PPathole) March 16, 2022
स्वतःला अब्जाधीशांचा सोशल मीडियासोबती म्हणून प्रसिद्धी मिळाल्याबद्दल लोकांच्या द्वेषाचा सामनाही त्याला करावा लागला. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, मिस्टर पाथोळे यांच्या ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या वाढली आहे आणि त्याचे आता एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. परंतु ते म्हणतात, की ते सोशल मीडियावर दबदबा निर्माण करण्यासाठी करत नाहीत.