Sharad Pawar : पक्ष फोडला तरी अजितदादांबद्दल शरद पवार यांच्या मनात काय?; युगेंद्र यांच्या प्रचारसभेत थेटच बोलल्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया

Sharad Pawar on Ajit Pawar : दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. अजितदादा पक्ष, चिन्ह आणि समर्थकांसह महायुतीत सत्ताधारी झाले. राष्ट्रवादीसह पवार कुटुंबियात फूट पडल्याची आरोळी उठली. लोकसभेनंतर विधानसभेत त्यावर शिक्कामोर्तब झाले. पक्ष फोडला तरी अजितदादांबद्दल शरद पवार यांच्या मनात काय आहे, हे एका सभेनिमित्त समोर आले.

Sharad Pawar : पक्ष फोडला तरी अजितदादांबद्दल शरद पवार यांच्या मनात काय?; युगेंद्र यांच्या प्रचारसभेत थेटच बोलल्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया
शरद पवार, अजित पवार
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 11:58 AM

राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. पवार कुटुंबियात फाटाफूट झाली. अजितदादा पक्ष, चिन्ह आणि समर्थकांसह सत्तेत सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी महायुती जवळ केली. महायुतीत तीन इंजिन लागले. लोकसभेनंतर आता विधानसभेतही पवार विरुद्ध पवार असा बारामतीच्या मातीत सामना रंगला आहे. एक बाजी शरद पवार यांनी मारली आहे. तर विधानसभेत अजितदादांचा (Ajit Pawar) पुन्हा कसल लागणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच युगेंद्र पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजितदादांविषयी केलेल्या एका वक्त्व्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बारामतीमधील शिरसुफळ येथे त्यांनी मतदाराशी संवाद साधला.

राजकारणाचा वापर लोकांसाठी व्हावा

तुम्ही मला जेव्हा निवडून दिलं तेव्हा मी विधानसभेत गेल्यावर एखादी योजना इथे करता येईल का असा विचार केला होता. एका योजनेतून या भागात काहीसे पाणी यायला लागलं. दूध संघाची सुरुवात आम्ही केली ते नंतर १ लाख लिटर वर गेलं. आम्ही हे दूध पुण्यात पोहचवले. डायनॅमिक कंपनी बारामती मध्ये आली. तिथे ८ लाख दूध येतं आणि त्यावर प्रक्रिया होते. शेती संकटात असेल तर दुसरा जोड धंदा पाहिजे राजकारण फक्त सत्ता आणि निवडणुकीसाठी नाही. राजकारणाचा वापर लोकांच्या जीवनात झाला तर त्याचा उपयोग आहे, असे शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अजितदादांसंदर्भात या संदर्भात नाही तक्रार

तुम्ही ४ वेळा मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं, २५ वर्ष मी बारामती मध्ये काम केलं. पुढची सत्ता अजित दादांच्या हातात दिली आणि निर्णय तुम्ही घ्यायचं सांगितलं. ३० वर्ष अजित पवारांनी कामं केलं, माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही तक्रार नाही, असे मोठे वक्तव्य शरद पवार यांनी केले. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुढची तयारी करायची असेल तर नेतृत्व तयार करावं लागेल.नवीन नेतृत्व तयार करायचं आहे म्हणून युगेंद्रची उमेदवारी दिली. मी मत मागायला आलो नाही, तुम्ही मला मतं द्यायला कधी काट कसर केली नाही. माझी निवडणूक असो, अजित दादा ची निवडणूक असो, सुप्रियाची असो तुम्ही कधी नाही म्हणाला नाहीत. लोकसभा कौटुंबिक राजकारणाची होती तरी तुम्ही सुप्रियाला मतदान केलं, असं ते म्हणाले.

१८ तारखेला बारामतीला सभा

युगेंद्रचे चिन्ह तुम्हाला माहिती आहे. या दिवसांचा उपयोग करा त्याचे चिन्ह लोकांपर्यंत न्या. १८ तारखेला शेवटची सभा बारामती मध्ये घ्यायला येईल. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि माझी उद्या मुंबईत सभा आहे. त्यानंतर मी नागपूर मध्ये जाईल आणि तिथून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि शेवटी बारामती मध्ये येईल. राज्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. सगळीकडे येणं शक्य नाही, जेवढं जायला लागेल तिकडे जाईल. निवडणुकीचे काम हातात घ्या आणि सांभाळा, असं आवाहन पवारांनी यावेळी केलं.

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा.
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा.
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?.
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?.
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले.
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.