दानवेंना पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही, तर माझ्या बापाची अवलाद नाही, हर्षवर्धन जाधवांचा इशारा
रावसाहेब दानवे यांचा हा दबाव मोडून काढा आणि मला सरंक्षण द्यावं," असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले. (Harshvardhan Jadhav Criticises Raoshaheb danve)
पुणे : “भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही,” अशी सणसणीत टीका कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. यामुळे रावसाहेब दानवे विरुद्ध हर्षवर्धन जाधव हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (Harshvardhan Jadhav Criticises Raoshaheb danve)
रावसाहेब दानवे यांनी राजकीय दबावाने गुन्हे दाखल केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने त्यांना दिलेल्या जामिनात राजकीय दबावाने गुन्हे दाखल झाल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे “राज्य सरकारने यात लक्ष घालावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यात लक्ष घालावं,” अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.
“पुढच्या निवडणुकीत रावसाहेब दानवेंना घरी नाही बसवलं, तर की माझ्या बापाची अवलाद नाही. रावसाहेब दानवे यांचा हा दबाव मोडून काढा आणि मला सरंक्षण द्यावं,” असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले. (Harshvardhan Jadhav Criticises Raoshaheb danve)
हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हर्षवर्धन जाधव यांनी कुणालाच सोडलं नाही. त्यांनी बेफामपणे अनेक नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.
कोण आहेत हर्षवर्धन ?
- हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
- हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.
- मात्र पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
- त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला.
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही.
- शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.
केवळ बातम्या होण्यासाठी शरद पवारांवर टीका; अजित पवारांचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा https://t.co/JewA9O6TNr #AjitPawar | #RajThackeray | #SharadPawar | @AjitPawarSpeaks | @NCPspeaks | @RajThackeray | @mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
(Harshvardhan Jadhav Criticises Raoshaheb danve)
संबंधित बातम्या :
हर्षवर्धन जाधवांच्या राजकारणाचा अस्त तर संजना जाधवांचा उदय? पिशोर ग्रामपंचायतीचा सविस्तर रिपोर्ट
आंदोलन प्रहारचं पण सासऱ्यांविरोधात जावई टाकीवर!
जावई ना माझं ऐकतो, ना उद्धव ठाकरेंचं, खैरेंना ‘ती’ भीती : दानवे