आयर्न मॅन सफारीवर! मिलिंद सोमण पुण्यातून थेट या शहरापर्यंत करणार 600 किमीचा प्रवास

Milind Soman : प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेते मिलिंद सोमण परत एकदा सायकल प्रवास करणार आहेत. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत सोमण यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा प्रवास कुठून कुठपर्यंत आणि कसा असणार याबाबत सर्व काही जाणून घ्या.

आयर्न मॅन सफारीवर! मिलिंद सोमण पुण्यातून थेट या शहरापर्यंत करणार 600 किमीचा प्रवास
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 8:01 PM

पुणे : प्रसिद्ध अभिनेते मॉडेल आणि फिटनेस फ्रिक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते मिलिंद सोमण कायम चर्चेत असलेले पाहायला मिळतात. सलग तिसऱ्या वर्षी करणारं मिलिंद सोमण सायकल प्रवास करणार आहेत. यासंदर्भात पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी माहिती दिली आहे. लाईफ लाँग ग्रीन राईड 3.0 अंतर्गत सायकल प्रवास करणार आहेत. यंदाचं सायकलवर प्रवास करण्याचं त्यांचं हे सलग तिसरं वर्षे आहे.

असा असणार प्रवास

मिलिंद सोमण यांचा लाईफ लाँग ग्रीन राईड 3.0 अंतर्गत सलग तिसऱ्या वर्षी सायकल प्रवास असणार आहे. या सायकल प्रवासादरम्यान गावा-गावातील शालेय विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिकांंमध्ये आरोग्य आणि पर्यावरणा संदर्भात जनजागृती करणार आहेत. सोमण हे पुणे ते अहमदाबाद असा 600 किमीचा प्रवास करणार आहेत. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबत माहिती दिली.

मिलिंद सोमण यांनी आपल्या करियरची सुरूवात 1988 मध्ये केली होता. त्यानंतर मॉडेलिंगमधून सुरूवात केलेले सोमण अलिशा चिनॉय हिच्या मेड इन इंडिया या व्हिडीओ अल्बममध्ये दिसले. यानंतर 2016 पर्यंत सोमण यांनी मालिकांमध्ये आणि चित्रपट क्षेत्रात काम केलं. 2012 पासून सोमण समाज प्रबोधनाचं काम करत आहेत. यामध्ये पर्यावरण संरक्षण, कर्करोग जागरूकता आणि महिला सक्षमीकरणाचा समावेश आहे. पर्यावरण मोहिमेचा भाग म्हणून 30 दिवसांमध्ये सोमण यांना 1500 किमी सायकल चालवण्याचा लिम्का रेकॉर्ड केला आहे. मिलिंद सोमण याचं वय 58 असलं तरी आपल्या फिटनेसमुळे ते कायम चर्चेत असतात.

दरम्यान, आताच मागे अवघ्या 3 तास आणि 15 मिनिटांमध्ये त्यांनी सायकल चालवत स्वत: जुना रेकॉर्ड मोडल होता. यासंदर्भात सोमण यांनी पोस्ट करत माहिती दिली होती. याआधी सोमण यांनी काश्मीरमध्ये 65 किमीचा प्रवास केला होता. स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी देशातील सर्वात मोठी शर्यक पिकॉथॉनची सुरूवात केली. 2015 मध्ये आयर्नमॅनचा किताब जिंकला होता.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.