Rahul bajaj | प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज अनंतात विलीन वैकुंठस्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

| Updated on: Feb 13, 2022 | 6:56 PM

भारतीय उद्योगसमूहात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते तरुण उद्योजकांसाठी एक प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या निधनामुळे बजाज समूहाचं वैयक्तिक खूप मोठं नुकसान झालं आहे. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे.

Rahul bajaj | प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज अनंतात विलीन वैकुंठस्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Rahul bajaj
Follow us on

पुणे – प्रसिद्ध उद्योजक, बजाज समूहाचे आधारस्तंभ राहुल बजाज (Rahul bajaj) यांच्या पार्थिवावर वैकुंठस्मशान भूमी येथे त्यांच्यावर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Funeral )करण्यात आले. काल (शनिवार) रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. गेल्या पाच दशकांपासून बजाज समूहाला (Bajaj Group)यशाच्या सर्वोच्च शिखरात पोहोचवण्यात त्यांचा खूप मोठा आणि मौल्यवान वाटा राहिला आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग समूहात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते तरुण उद्योजकांसाठी एक प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या निधनामुळे बजाज समूहाचं वैयक्तिक खूप मोठं नुकसान झालं आहे. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. राहुल बजाज यांना 2001 मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

राहुल बजाज यांच्या निधनानंतर आकुर्डी येथील बजाज कंपनी आवारात त्याचे पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बजाज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर साडेअकरा वाजता सांस्कृतिक भवन प्रागण येथे पार्थिव नेण्यात आले. तिथे पोलीस पथकाच्या वतीने दुपारी बारा वाजता मानवंदना देणात आली. त्यानंतर दर्शन सुरू करण्यात आले. पोलीस पथकाच्या वतीने दुपारी बारा वाजता मानवंदना देणात आली. त्यानंतर दर्शन सुरू करण्यात आले. भर उन्हातही मोठ्या प्रमाणावर अनेक कामगारांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी ४ वाजता त्यांचे पार्थिव पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

अल्प परिचय –

  • बंगालमधील मारवाडी कुटुंबात 10जून 1938रोजी त्यांचा जन्म झाला.
  • स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांचे ते नातू होते.
  • वडील कमलनयन बजाज यांच्याकडून उद्योगाचा वारसा त्यांना मिळाला.
  • सेंट स्टिफन्स कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात बीए केले.
  • मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चं शिक्षण घेतले.

बाजारभावापेक्षा कमी किंमतीतलं घरं तुमची वाट पाहतंय… ‘पीएनबी’कडून मालमत्तांचा ‘मेगा ई-लिलाव’

यूपी, बिहारचा मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो, तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री का ठरवू शकत नाही?; जितेंद्र आव्हाडांचा सवाल

सेकंदाचा उशीर झाला असता तरी गेला असता जीव, महिला गार्डनं कसं वाचवलं मुलाला? पाहा थरारक Video