अहमदनगर: राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 24 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. नव्या कृषी कायद्यांना या शेतकऱ्यांचा विरोध आहे. याबाबत सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप सरकारला त्यावर यश मिळालेलं नाही. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावं, अशी मागणी आता करण्यात येत आहे. (Anna Hazare meets a delegation of farmers from Delhi)
अण्णा हजारे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होत, आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी दिल्लीतील 6 शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अण्णांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीत दाखल झालं आहे. हे शिष्टमंडळ अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चा करुन त्यांना आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करणार आहे.
“ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या आंदोलनात सहभागी होतील असं आपल्याला वाटत नाही. कारण, सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करत आहे. सरकारने शेतकरी विरोधात काही केलं नाही. जर संवादच झाला नाही तर गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. पण संवाद झाला तर शेतकऱ्यांना न्याय मिळून हे प्रकरण सुटेल”, असा आशावाद केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला होता.
I don’t think Anna Hazare ji will join. We have not done anything against the farmers. It is the right of farmers to sell their produce in mandi, to traders or anywhere else: Union Minister Nitin Gadkari on farmers’ protest pic.twitter.com/veSvhn6DWu
— ANI (@ANI) December 15, 2020
8 डिसेंबर रोजी दिल्लीतील शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यावेळी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी इथं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत एक दिवसीय लाक्षणिक उपोषणही केलं होतं. त्यावेळी केंद्र सरकारनं शेतकरी आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी अण्णांनी केली होती.
“केंद्र सरकारनं यापूर्वी दोन वेळा लेखी आश्वासन देऊनही ते पाळले नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाने प्रश्न सुटले नाहीत. तर दिल्लीत माझ्या आयुष्यातील शेवटचं आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी करेन”, असा इशारा अण्णांनी उपोषणावेळी दिला आहे.
संबंधित बातम्या:
दिल्ली बॉर्डरवर पोहोचले हजारो शेतकरी, आज मोठ्या आंदोलनाची शक्यता
Anna Hazare meets a delegation of farmers from Delhi