Pune crime : चाकूचा धाक दाखवून पुण्याच्या उरुळी कांचनमध्ये दागिने पळवले; झटापटीत महिला जखमी
दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात उरुळी कांचनमध्ये एक महिला जखमी (Injured) झाली आहे. ही घटना रविवारी (ता. 25) मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमरास घडली आहे. तर अन्य एका ठिकाणी या दरोडेखोरांचा (Thieves) दरोड्याचा प्रयत्न फसला आहे.
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (Uruli Kanchan) ग्रामपंचायत हद्दीतील पंढरस्थळ येथे दरोडेखोरांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला आहे. यात एक तोळा सोन्याचे दागिने लुटल्याची माहिती समोर आली आहे. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी (Injured) झाली आहे. ही घटना रविवारी (ता. 25) मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमरास घडली आहे. तर अन्य एका ठिकाणी या दरोडेखोरांचा (Thieves) दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. बेबी महादेव उर्फ बळी कांचन (वय २५, रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील पांढरस्थळ या ठिकाणी महादेव उर्फ बळी तुकाराम कांचन व त्यांची पत्नी हे दोघेच राहतात. रविवारी संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घराचे दार बंद करून झोपले होते.
खिडकीचे खिळे काढून प्रवेश
सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास एका दरोडेखोराने खिडकीचे खिळे काढून खिडकी उघडली. खिडकीतून हात घालून खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला दरवाजा उघडता आला नाही. तेव्हा बाहेर पडलेल्या काठीच्या सहाय्याने दरवाज्याची कडी उघडली व घरामध्ये प्रवेश केला. स्वयंपाक घरात आतील बाजूस राहणाऱ्या खोलीत बेबी व बळी कांचन हे दांपत्य झोपी गेले असताना जवळपास पाच दरोडेखोरांनी दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला.
महिला रुग्णालयात दाखल
काहीजणांनी घरातील साहित्याची उलथापालथ करीत घरात पैसे तसेच दागिने आहेत का? अशी विचारणा करुन दाम्पत्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अंगावरील दागिने घेऊन चोरटे पळून गेले. त्यांचा शोध पोली, घेत आहेत. दरम्यान, महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.