Pune Farmers : मॉन्सून हाकेच्या अंतरावर मात्र खतांसह डिझेल आणि यंत्रसामग्रीच्या किंमतीमुळे शेतकऱ्याचं कोलमडलं आर्थिक गणित

यावर्षी मॉन्सून दरवर्षीपेक्षा आधी अंदमानच्या दक्षिण समुद्रात दाखल झाला. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. 28) दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरीन समुद्राच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Farmers : मॉन्सून हाकेच्या अंतरावर मात्र खतांसह डिझेल आणि यंत्रसामग्रीच्या किंमतीमुळे शेतकऱ्याचं कोलमडलं आर्थिक गणित
मॉन्सूनपूर्व कामाच्या लगबगीत शेतकरीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 10:28 AM

आंबेगाव, पुणे : मॉन्सून (Monsoon) हाकेच्या अंतरावर आला आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, शिरूर आणि जुन्नर येथील अनेक शेतकरी पेरणीच्या नियोजनात जुंपले आहेत. मात्र वाढत चाललेल्या खतांच्या, डिझेलच्या किंमती आणि वाढती मजुरी यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले (Financial planning collapsed) आहे. हवामान खात्याने मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तविला असल्याने शेतकरी पेरणी पूर्व मशागतीला लागला आहे. बियाणे, खते तसेच पेरणीसाठी लागणारी अवजारे यांची जुळवाजुळव बळीराजा करताना दिसत आहे. मात्र शेतीची मशागत करताना बियाणांच्या तसेच अवजारांच्या, खतांच्या आणि यंत्रसामग्रीला लागणाऱ्या डिझेलच्या वाढलेल्या किंमती बघून शेती करायची कशी, या विवंचनेत शेतकरी (Farmers) आहे. खतांच्या किंमतीतही यावर्षी भरमसाठ वाढ झाली आहे.

यंदा मॉन्सून लवकर दाखल

यावर्षी मॉन्सून दरवर्षीपेक्षा आधी अंदमानच्या दक्षिण समुद्रात दाखल झाला. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. 28) दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरीन समुद्राच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मॉन्सून 27 मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच वर्तविली होती. केरळातील आगमनात चार दिवसाची तफावत होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

नैसर्गिक संकटासह मानवनिर्मित संकटाचाही करावा लागत आहे सामना

यंदा थोडा आधीच मॉन्सून दाखल होत आहे. त्यामुळे पेरणीची तसेच मशागतीची कामे शेतकऱ्यांना लवकर संपवावी लागणार आहेत. मात्र महागाईने शेतकऱ्यांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. मशागतीच्या कामांना लागणारी अवजारेच महाग झाली नसून खते आणि इतर यंत्रसामग्री तसचे डिझेल अशा एक ना अनेक समस्यांनी शेतकरी त्रस्त झाला आहे. नैसर्गिक संकटांसोबतच मानवनिर्मित संकटाचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.