पुण्याच्या पाच तरुणी भोरमधील भाटघर धरणात बुडाल्या; तिघांचे मृतदेह सापडले

पुण्यातील भोरमधील भाटघर धरणावर पर्यटनासाठी आलेल्या हडपसर येथील पाच तरुणींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली. या पाचही महिला हडपसमधील राहणाऱ्या असून पाच पैकी तीन तरुणींचे मृतदेह सापडले आहेत.

पुण्याच्या पाच तरुणी भोरमधील भाटघर धरणात बुडाल्या; तिघांचे मृतदेह सापडले
पुण्यातील भोरमधील भाटघर धरणात पाच तरुणी बुडाल्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 9:52 PM

पुणेः पुण्यातील भोरमधील (Bhor Pune) भाटघर धरणावर (Bhatghar Dam) पर्यटनासाठी आलेल्या हडपसर येथील पाच तरुणींचा बुडून मृत्यू (Five young women drown) झाल्याची धक्कादायक घटना आज घडली. या पाचही महिला हडपसमधील राहणाऱ्या असून पाच पैकी तीन तरुणींचे मृतदेह सापडले आहेत. तर दोघींच्या मृतदेहांचा शोध सुरु असून भोरमधील नागरिकांना त्यांचा शोध सुरु ठेवला आहे. ज्या तरुणी भोरमधील भाटघर धरणावर पर्यटनासाठी आल्या होत्या त्यांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

त्या बुडाल्या नंतर त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक रेस्क्यू टीम आणि गावकऱ्यांकडून शोधकार्य सुरू केले आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून पुढील तपास सुरु आहे.

या आहेत बुडालेल्या तरुणी

भोरमधील भाटघर धरणावर पर्यटनासाठी खुशबू लंकेश रजपूत (वय 19), मनीषा लखन रजपूत (वय 20), चांदणी शक्ती रजपूत (वय 21), पूनम संदीप रजपूत (वय 22), मोनिका रोहित चव्हाण (वय 23) या पाच तरुणींचा भाटघर धरणात बुडून मृत्यू झाला आहे. यामधील तिघांचे मृतदेह सापडले असून दोघी तरुणींच्या मृतदेहाचा शोध अजून सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. भाटघर धरणावर स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली असून त्यांच्याद्वारेच बुडालेल्या तरुणींचा मृतदेहांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पर्यटनासाठी आल्या आणि घात झाला

या पाच ही तरुणी हडपसरच्या असून त्या पर्यटनासाठी भोरमधील भाटघर धरणावर पर्यटनासाठी आल्या होत्या. या तरुणी मौज मजा करण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ही दुर्घटना घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाचही तरुणी धरणात बुडाल्यानंतर त्यांचे साहित्य मात्र धरणाच्या काठावर तसेच पडून होते. त्यांचे चप्पल, मोबाईल, पर्स आदी साहित्य तिथेच आढळून आले आहे.

दोघींच्या मृतदेहांचा शोध

पाच पैकी तिघींचे मृतदेह मिळाले असले तरी दोघींचे मृतदेहांचा शोध सुरु असून या घटनेची नोंद पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पाच महिलांचा मृत एकदमच झाल्याने धरणावर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती.

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.