पुणे – शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी (Traffic jams)करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. शहरात मेट्रोचा (Metro)होत असलेल्या विस्तार येत्या काळात वाढलेली वाहतूक कोंडी कमी करण्यास उपयुक्त ठरेल.मात्र मेट्रोचा विकास करत असताना शहरात ठिकठिकाणी रस्त्याची,उड्डाण पुलाची कामेही सुरु आहेत. नुकताच कर्वेनगर येथील शहरातील पहिला उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर आता सिंहगड रोड भागातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी दुहेरी उड्डाण पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र सिंहगड रस्त्यावर महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा आराखडा चुकीचा असल्याचे आक्षेप घेण्यात आले आहेत . यामुळे भविष्यात या रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढण्याची टीका होत आहे.याबाबतच्या सूचनाही महापालिकेला देण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून मिळलेल्या सूचनांचा विचार केला जाईल अशी माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार(Commissioner Vikram Kumar) यांनी नुकतीच दिली आहे.
महापालिकेकडून राजाराम पूल ते फनटाईम सिनेमापर्यंत हा पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या पुलाचे एकूण अंतर 2 किलोमीटर असेल. यामध्येराजारामपूल, विठ्ठलवाडी, हिंगणे, संतोष हॉल, माणिक बाग तसेच पुढे गंगा भाग्योदयहे परिसर येणार आहेत. या पुलामुळे नागरिकांना विना सिग्नल प्रवास करता यावा हा मुख्य उद्देश आहे.
ज्या दोन किमीच्या मार्गात हा उड्डाणपूल उभा राहत आहे. तिथे सिग्नलचा त्रास वाचणे अपेक्षित होते . मात्र प्रत्यक्षात हा पूल फनटाईम ऐवजी गंगा भाग्योदयपासून ते विठ्ठलवाडी चौकाच्या अलीकडेच उतरणार आहे. त्यामुळे केवळ संतोष हॉल, हिंगणे तसेच माणिक बाग येथील तीनच सिग्नल कमी होणार आहेत. याबरोबरच हा उड्डाणपूल विठ्ठलवाडी चौकात जिथे संपणार, तिथे विश्रांतीनगरकडून मुख्य रस्त्यावर येणारी वाहतूक आहे. ह्या दोन्ही गोष्टी ही एकत्र येणार येतील त्यामुळे चौकात बॉटल नेक स्थिती होऊन वाहतूक कोंडी होईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात कोंडी फोडणाऱ्या उड्डाण पुलाची निर्मिती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Gadchiroli : शाळेच्या बसला भरधाव ट्रकची जोरदार धडक, 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर