TB : क्षयरोग रुग्णांसाठी आता फूड बास्केट! सामुदायिक सहभागातून राबवण्यात येणार उपक्रम; वाचा सविस्तर…

दरवर्षी सुमारे 27 लाख नवीन टीबी रुग्ण आढळून येतात आणि अंदाजे चार लाख रुग्णांचा मृत्यू होतो. पुणे क्षेत्रात, 11 क्षयरोग नियंत्रण कार्यालये आहेत आणि 3,871 रुग्ण उपचाराचा लाभ घेण्यासाठी नागरी आरोग्य विभागाकडे नोंदणीकृत आहेत.

TB : क्षयरोग रुग्णांसाठी आता फूड बास्केट! सामुदायिक सहभागातून राबवण्यात येणार उपक्रम; वाचा सविस्तर...
क्षयरोग रुग्णImage Credit source: Express
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 7:30 AM

पुणे : शहराच्या क्षयरोग नियंत्रण विभागाने पौष्टिक आहाराची बास्केट (Food basket) तयार केली आहे. त्यात तांदूळ, गव्हाचे पीठ, गूळ, तेल आणि हरभरा, मूग डाळ, मटकी आणि शेंगदाणे यांचा समावेश आहे. प्रत्येक रुग्णाला लवकरच देण्यात येणार आहे. जनतेच्या सहभागातून (Community participation) हे कार्य करण्यात येणार आहे. ‘एक्स्प्रेस’ने यासंबंधी वृत्त दिले आहे. शहरातील टीबी नियंत्रण अधिकारी डॉ. प्रशांत बोठे यांनी सांगितले, की अंदाजे दरमहा खर्च रु. 1,000 इतका आहे आणि आम्हाला आशा आहे, की नागरिक आणि संस्था एका वर्षासाठी टीबी रुग्ण (Tuberculosis) दत्तक घेण्याच्या प्रकल्पात योगदान देऊ शकतील. केंद्रीय क्षयरोग विभागाने क्षयरुग्णांना सामुदायिक सहाय्य देण्याच्या हेतूने आणि त्यांच्यावरील उपचारांचे परिणाम सुधारण्यासाठी अतिरिक्त मदत प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम 2025पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.

निक्षय पोर्टल

आमच्याकडे कमी उत्पन्न गटातील सुमारे 3,175 टीबी रुग्ण आहेत, ज्यांना दत्तक घेतले जाऊ शकते. क्षयरोगाच्या रुग्णाला पुरेसे पोषण मिळावे यासाठी अंदाजे खर्च 12,000 रुपये असेल. आम्ही लवकरच या फूड बास्केट आणू अशी आशा आहे, असे डॉ. बोठे म्हणाले. निक्षय पोर्टलवर (Ni-End, Kshay TB) सामुदायिक समर्थन प्राप्त करण्यास संमती दिलेल्या रुग्णांची यादी उपलब्ध आहे. निक्षय ही राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत वेब-सक्षम रुग्ण व्यवस्थापन प्रणाली आहे.

‘क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वांचा सहभाग’

पोर्टलचा उपयोग सार्वजनिक आणि खासगी आरोग्य कर्मचारी त्यांच्या देखरेखीखाली केसेस नोंदवण्यासाठी, देशभरातील प्रयोगशाळांमधून चाचण्या मागवण्यासाठी, उपचारांचा तपशील रेकॉर्ड करण्यासाठी, उपचारांच्या पालनावर नजर ठेवण्यासाठी आणि काळजी पुरवठादारांमध्ये केसेस हस्तांतरित करण्यासाठी वापरतात. अधिकाऱ्यांनी सांगितले, की लोकांचा आणि समुदायाचा वाढता सहभाग केवळ क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नातच नाही तर क्षयरोगाच्या रुग्णांवरील कलंक कमी करण्यास देखील मदत करेल.

हे सुद्धा वाचा

दरवर्षी आढळतात 27 लाख नवीन टीबी

दरवर्षी सुमारे 27 लाख नवीन टीबी रुग्ण आढळून येतात आणि अंदाजे चार लाख रुग्णांचा मृत्यू होतो. पुणे क्षेत्रात, 11 क्षयरोग नियंत्रण कार्यालये आहेत आणि 3,871 रुग्ण उपचाराचा लाभ घेण्यासाठी नागरी आरोग्य विभागाकडे नोंदणीकृत आहेत.

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.