Pune crime : मित्रांसोबत पत्नीला जबरदस्तीनं शरीरसंबंधास भाग पाडलं; पुण्यातली संतापजनक घटना, गुन्हा दाखल

आरोपी पती पत्नीला मानसिक त्रास देत होता. तिची इच्छा नसतानाही त्याने 2020मध्ये हडपसर येथील एका लॉजवर मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. यानंतर जुलै 2021मध्ये कोरेगाव पार्क परिसरात एका फ्लॅटवर दुसऱ्या एका मित्रासोबत पत्नीला अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

Pune crime : मित्रांसोबत पत्नीला जबरदस्तीनं शरीरसंबंधास भाग पाडलं; पुण्यातली संतापजनक घटना, गुन्हा दाखल
महिलेचे लैंगिक शोषण (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 5:29 PM

पुणे : आपल्या पत्नीला मित्रांसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याची संतापजनक आणि किळसवाणी घटना पुण्यात घडली आहे. भारती विद्यापीठ पोलीस (Bharati vidyapeeth police station) ठाण्याच्या हद्दीतील या किळसवाण्या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला (Wife) त्याच्या दोन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. हा सर्व प्रकार सुरू असताना महिलेचा पती कोपऱ्यात उभे राहून हे सर्व पाहात होता, अशी संताप आणणारी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे एक-दोन वेळा नाही, तर वारंवार असे प्रकार होत असल्याचेही समोर आले आहे. शेवटी अनावर झाल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. यासर्व प्रकारानंतर महिलेने (48 वय) पती आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात पोलिसांत गुन्हा (Filed a crime) दाखल केला आहे.

अनैसर्गिक संबंध ठेवण्यासही भाग पाडले

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती पत्नीला मानसिक त्रास देत होता. तिची इच्छा नसतानाही त्याने 2020मध्ये हडपसर येथील एका लॉजवर मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. यानंतर जुलै 2021मध्ये कोरेगाव पार्क परिसरात एका फ्लॅटवर दुसऱ्या एका मित्रासोबत पत्नीला अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. हे सर्व होत असताना पती मात्र कोपऱ्यात उभे राहून सर्व पाहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे सुद्धा वाचा

वारंवार घडत असल्याने अनावर

हे सर्व वारंवार घडत असल्याने शेवटी संतापलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. पतीच्या अशा कृत्याचा अनेकजण संताप व्यक्त करत आहेत. त्यांच्यात इतर काही वाद आहेत का, पतीला कोणता मानसिक आजार आहे का, त्याने इतर कोणासोबत अशाप्रकारचे कृत्य केले आहे का तसेच त्याचे मित्र ज्यांच्यासोबत पत्नीला शरीरसंबंध करण्यास भाग पाडले, त्यांची पार्श्वभूमी काय, यासर्वांचा तपास आता पोलीस करीत आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.