सातारा : माजी दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जानकर यांचं निधन 31 मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. आज त्यांची रक्षा विसर्जित करण्यात आली. आईची रक्षा कुठल्या नदीमध्ये नाही तर वृक्षारोपण करुन रोपाच्या बुंध्याला ही रक्षा विसर्जित करण्यात आली. त्यामुळे आईच्या रक्षा विसर्जनाच्या माध्यमातून महादेव जानकर यांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे. (Mahadev Jankar immersed his mother’s Raksha in the roots of tree)
गुणाबाई जानकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्यावर 31 मार्च रोजी माण तालुक्यातील पळसावडे इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज रक्षा विसर्जन करण्यात आलं. मृतकाच्या रक्षा नदीमध्ये विसर्जित करण्याचा प्रघात आहे. पण जानकर कुटुंबाने गुणाबाई यांच्या रक्षा नदीमध्ये विसर्जित न करता वृक्षारोपण करत, रोपाच्या बुडाला ही रक्षा अर्पण केली. या माध्यमातून महादेव जानकर यांनी नवा आदर्श निर्माण केलाय.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना यावेळी एक महत्वाची सूचना करण्यात आली. येत्या दोन दिवसांत आपल्या आपल्या गावात, घरासमोर दोन झालं लावून त्यांचं संगोपन करावं आणि एका राष्ट्रकार्याला हातभार लावावा, असं आवाहन जानकर यांनी केलं आहे.
महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर (वय 92) यांचं 31 मार्च रोजी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. त्यांना एकूण 3 मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. सातारा जिल्ह्यातील पळसावडे (ता. माण) इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आली. गुणाई जानकर यांचं मूळगाव सातारा जिल्ह्यातील धनगरवाडी हे हो. गुणाबाई यांनी शिक्षण घेतलं नसलं तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ करुन उच्चशिक्षित केलं. महादेव जानकर यांच्या संघर्षाच्या काळात आई गुणाबाई यांचा खंबीर पाठिंबा राहिला होता.
महादेव जानकर हे मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या शेजारील निवासस्थानी राहण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्यावेळी गुणाबाई यांनी घेतलेल्या कष्टाचं चीन झालं, अशीच भावना सगळ्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या निधनामुळे रासप कार्यकर्त्यांसह महादेव जानकर यांच्या निकटवर्तीयांनी हळहळ व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी गुणाबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
इतर बातम्या :
Mahadev Jankar immersed his mother’s Raksha in the roots of tree