चार प्रकल्प गेलेत, हे काय गुंतवणूक आणणार?, आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर घणाघात

बच्चू कडू यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही ठरवू, असा सुतोवाच आदित्य ठाकरे यांनी केला.

चार प्रकल्प गेलेत, हे काय गुंतवणूक आणणार?, आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर घणाघात
आदित्य ठाकरे यांनी सुनावले Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 2:31 PM

पुणे : आदित्य ठाकरे म्हणाले, पुणे आयुक्तांना भेटलो. सी ४० , व्हीआरएस या संस्थांसोबत रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आणि पाणी तुंबणे यावर काम व्हावं. वातावरणीय बदल खूप मोठा बदल होत आहे. पुणे पालिकेतून इलेक्ट्रानिक्स व्हेईकल बससोबतच इलेक्ट्रॉनिक्स बाईक, शार्ट बस सुरू करण्याबाबत चर्चा व्हावी. गेल्या दिवसांत मुसळधार पाऊस पडला. पाणी तुंबण्याचे विषय गंभीर आहेत. पुण्याचा रिव्हर फ्रंट विकसित झाला पाहिजे. पर्यावरणवादींना सोबत घेऊन काम व्हावं.

पर्यावरण आणि शहरीकरण यावर माझी कायम चर्चा होत असते. पण शहरीकरणामुळे मी चिंतेत आहे. पर्यावरणवादी एजन्सींना सोबत घेऊन चर्चा करून काम केलं गेलं पाहिजे, असं माझं मत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

महाराष्ट्राचे चार प्रकल्प गेले. मिहानमध्ये एअर बस प्रकल्प आणू म्हणून आधी का सांगितलं, असंही ते म्हणाले. Mou झालं होतं तर दाखवा म्हणून सत्ताधाऱ्यांनी विचारलं त्यावर बोलताना म्हणाले, या खोके सरकारनं एकही उद्योग राज्यात ठेवला नाही.

आपल्या मुख्यमंत्री मंडळींनी दहिहंडी, राजकीय भेटी, फोडाफोडी हे सोडून काही केलं नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन मुख्यमंत्री यांनी काही आणलेलं नाही. राज्यात हे काय गुंतवणूक आणणार?

कृषिमंत्री कोण शेतकऱ्यांना माहीत नाही. उद्योजकांना उद्योगमंत्री माहीत नाही. या राज्यात चाललंय काय, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला. राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांचं तरी एक इंजिन फेल का होतंय? त्यापेक्षा तर आमचं चांगलं चाललं होतं केंद्रासोबत, असंही ते म्हणाले.

आमच्या काळात कोविडच्या काळात साडेसहा हजार कोटी आणले. दोन चायनीज कंपनींसोबतचं काम थांबवलं. बच्चू कडू यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही ठरवू, असा सुतोवाच आदित्य ठाकरे यांनी दिला.

देवेंद्र फडणवीसांबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांचे बिकट हाल सुरू आहेत. प्रकल्प बाहेर जात आहेत. गलिच्छ राजकारण सुरु आहे. आत टाका, तडीपारी लावा हे सोडून मॅच्यूअर पॅालिटीक्स होणं गरजेचं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.