पुणे : तंत्रज्ञानाचा वापरा गावपातळीवर गेला आहे. मग त्याच तंत्रज्ञानाच्या वापरातून कमाईचे फंडे सांगितले जात आहे. अन् अनेक जण त्यावर विश्वास ठेऊन त्या फंड्यांवर काम करत आहे. परंतु सावध व्हा,अशा गोष्टीमुळे तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. एखाद्या छोट्या कमाईचे आमिष दाखवून तुम्हाला मोठ्या रक्कमेला मुकावे लागणार आहे. पुणे (pune news)जिल्ह्यातील या प्रकारानंतर अनोळखी क्रमांकापासून सावध व्हा. पुणे येथील हिंजवडीत एक युवक १२ लाखांत (loses 12 lakh)लुबाडला गेला.
हिजंवडीत राहणारा रवी शंकर सोनकुशर याला व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून एक मेसज आला. त्यात व्हिडीओला लाईक केल्यास ५० रुपये मिळणार असल्याचा दावा केला गेला. त्यानुसार त्याने काम सुरु केला. प्रत्येक व्हिडिओला लाईक म्हणून ५० रुपयांप्रमाणे सुरुवातीला त्याला नऊ हजार रुपये मिळाले. त्यामुळे त्याचा विश्वास बसला.
कशी केली फसवणूक :
आता या टास्कमध्ये पैसे गुंतवले तर रक्कमेचा चांगला रिफंड आणि बोनस देखील मिळेल, असे आश्वासन त्याला दिले गेले. त्यासाठी एका टेलिग्रॉम ग्रुपला (telegram)त्याला जोडण्यात आले. या टास्कमध्ये सोनकुशर यांनी १२ लाख २३ हजार ५०० रुपये गुंतवले. त्यानंतर संबंधित अनोळखी व्यक्तीला रिफंड व बोनसबाबत विचारले टेलिग्रॉमवर विचारले. मात्र, हा ग्रुपच संबंधिताने डिलीट करून बंद केला. त्यानंतर रवी शंकर सोनकुशर यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठले.
तक्रार कशी करावी :
जर तुमची ऑनलाईन फसवणूक झाली तर ३ दिवसांच्या आत त्या घटनेची तक्रार करणं गरजेचं आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर सुद्धा तक्रार नोंदवू शकता. ऑनलाईन फ्रॉड झाला तर बँकेत कळवलं तर तुमच्या अकाउंटचे सर्व व्यवहार बंद केले जातात. मात्र मोठं नुकसान होण्यापासून तुम्ही वाचू शकता. तसेच नियमांनुसार १० दिवसांत तुम्हाला रिफंड मिळण्याची शक्यता देखील असते.