निवृत्त अधिकारी म्हणतो सही करण्याचा प्रश्नच नाही, पुणे पालिकेला 5 कोटींचा गंडा कोणी घातला?
महापालिकेतून सेवानिवृत्त झालेले अधीक्षक अभियंता संदीप खांदवे यांची बनावट स्वाक्षरी करून तब्बल 4 कोटी 88 लाख रुपयांचा खोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (pune municipal corporation fraud)
पुणे : महापालिकेतून सेवानिवृत्त झालेले अधीक्षक अभियंता संदीप खांदवे यांची बनावट स्वाक्षरी करून तब्बल 4 कोटी 88 लाख रुपयांचा खोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खांदवे यांची सही करुन एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प विभामध्ये हा घोटाळा झाला आहे. (fraud of rupees 5 crore in pune municipal corporation)
नेमका प्रकार काय ?
मलनिस्सारण प्रकल्प विभाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता संदीप खांदवे हे 31 ऑगस्ट 2019 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा पदभार कार्यकारी अभियंता सुष्मिता शिर्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात आला. त्यानंतर सुमारे 3 महिन्यानंतर 27 नोव्हेंबर 2019 रोजी काही अधिकाऱ्यांनी संगनमताने खांदवे यांची बनावट स्वाक्षरी करून पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला 4 कोटी 88 लाख 24 हजार 505 रुपयांचे बिल परस्पर अदा केले, असा आरोप आहे.
ती सही मी केली नाही : खांदवे
मलनिस्सारण प्रकल्प विभागाने संबंधित ठेकेदाराला शहरात ठिकठिकाणी मलवाहिण्या टाकण्याचे एकूण 56 कोटी 57 लाखाचे कंत्राट 2017 साली दिलेले आहे. त्यानुसार शहरातील सुमारे 51 किलोमीटर लांबीच्या नदीनाल्यांमध्ये 36 ठिकाणचे मैलापाणी बंदिस्त नलिकांद्वारे जवळच्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून नेहण्यात येणार आहे. या कांत्राटतील, बारावे बिल काढताना हा मोठा घोटाळा झाला. याबाबत बोलताना ‘त्या बिलावर मी सही केलेली नाही. महापालिकेच्या प्रदीर्घ सेवेत मी अत्यंत जबाबदारी काम केले आहे. सेवानिवृत्तीनंतर तर अशी सही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे निवृत्त संदीप खांदवे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, ही सही मी केली नसल्याचे निवृत्त अधिकारी सांगतात. या प्रकारानंतर खांदवे यांची सही नेमकी कोणी केली, याची चर्चा रंगली आहे. यावर बोलताना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच या प्रकरणाचा आम्ही तपास करणार आहोत, असे महापालिकेचे मुख्य लेखापाल उलका कळमकर यांनी सांगितलं.
कोकणातलं एक गाव सात दिवस सुट्टीवर, गावपळणीच्या परंपरेची समृद्ध बातमीhttps://t.co/xRj8pmOO8v#GaonPalan #ShiroleVillage #Sindhudurga
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
संंबंधित बातम्या :
मिळकत कर आणि दंडाच्या रकमेतून पुणे महापालिका मालामाल!
भाजपच्या पुण्यातील 19 नगरसेवकांच्या पक्षांतराची चर्चा, अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांच्या सुरात सूर
Pune new 23 villages: पुणे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावांची यादी
(fraud of rupees 5 crore in pune municipal corporation)