Pune : इंधन दरवाढीचा सर्वांनाच फटका; शाळेची फी, वाहतूक अन् खाद्यपदार्थांसाठी खिसा करावा लागतोय रिकामा

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol diesel price hike) सातत्याने वाढत (Increase) आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसून येत आहे. एकदा का इंधनाचे (Fuel) दर वाढले, की सर्वच गोष्टी महाग होतात. याच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

Pune : इंधन दरवाढीचा सर्वांनाच फटका; शाळेची फी, वाहतूक अन् खाद्यपदार्थांसाठी खिसा करावा लागतोय रिकामा
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 7:30 AM

पुणे : पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol diesel price hike) सातत्याने वाढत (Increase) आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसून येत आहे. एकदा का इंधनाचे (Fuel) दर वाढले, की सर्वच गोष्टी महाग होतात. याच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पुणेकर यावर व्यक्त होत आहेत. पुण्यात सध्या आणखी एक प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे शाळेची फी… एका पालकास त्यांच्या शाळेच्या व्हॅन चालकाने नवीन शैक्षणिक वर्षापासून फी आणि सेवा वाढवल्याची माहिती दिली तेव्हा त्यांना धक्काच बसला. गेल्या दोन महिन्यांपासून, मी दरमहा स्कूल व्हॅनसाठी 1,000 भरत आहे आणि अचानक आम्हाला सांगण्यात आले, की फी वाढवून 1,200 करण्यात आली आहे. इंधन दरवाढीचे कारण दिले गेले आणि आम्ही दोघेही पालक काम करत असल्याने आम्हाला वाढलेली फी भरावी लागेल, असे एका पालकाने सांगितले.

विद्यार्थ्यांची अडचण

अलीकडच्या काळात इंधनाच्या किंमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे देशभरातील सर्व सेवा आणि उत्पादनांवर परिणाम झाला आहे. अगदी स्कूल बस, व्हॅन आणि ऑटो-रिक्षांपासून अगदी स्नॅक सेंटर्स आणि फूड मेस सेवेपर्यंत सर्वांनी त्यांचे दर वाढवले आहेत. पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी येऊन शिक्षण घेत असल्याने ते सर्व या स्नॅक सेंटर्स आणि फूड मेस सेवांवर पूर्णपणे अवलंबून आहेत.

सुमारे 5 ते 20पर्यंत वाढवले खाद्यपदार्थाचे दर

आम्ही प्रत्येक खाद्यपदार्थाचे दर सुमारे 5 ते 20पर्यंत वाढवले आहेत. जसे पूर्वी आम्ही पोहे 15 रुपयांना विकायचो ते आता 20 रुपये झाले आहे. सर्व कच्चा माल, तेल आणि मजूर यांचे दरही वाढले असल्याने अशा परिस्थितीत व्यवसाय चालवणे आम्हाला परवडणारे नाही, नवी पेठ परिसरातील एका स्नॅक सेंटरचे मालक सांगत होते. फूड मेस मालकांची अवस्थाही अशीच आहे. शहरातील विद्यार्थ्यांसाठी फूड मेस सर्व्हिसेसचे म्हणणे काय आहे, ते ही जाणून घेऊ या… विद्यार्थ्यांसाठी फूड मेस चालवणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस भाज्यांचे दर वाढत असून इतर सर्व कच्चा मालही महाग झाला आहे. आम्ही आमची विद्यार्थी संख्या कमी करण्यास तयार आहोत पण आम्हाला आता तोटा परवडणारा नाही. त्यामुळे आमच्या फूड मेसचे दर सुमारे 20% वाढले आहेत.

वाहतूक महागली

महाराष्ट्र वाहतूक वाहन मालक आणि चालक संघटनेचेही असेच काहीसे म्हणणे आहे. इंधनाच्या वाढलेल्या किमतींमुळे आमचे सर्व असोसिएशन सदस्य अडचणीत आले आहेत आणि त्याचा सर्वाधिक परिणाम स्कूल बस आणि व्हॅनच्या व्यवसायावर झाला आहे. साथीच्या आजारामुळे दोन वर्षांपासून सर्व बसेस उभ्या होत्या आणि आता आम्ही पुन्हा काम सुरू करत आहोत. ही इंधन दरवाढ आम्हाला त्रास देत आहे आणि म्हणून आम्ही पुढील शैक्षणिक वर्षासाठी सुमारे 20 ते 25% दरांत वाढ केली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. एकूणच महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून दिलासा मिळावा, असा सूर उमटत आहे.

आणखी वाचा :

Pandharpur Vitthal Wari : दोन वर्षांनंतर यंदा पायी वारी निघणार, 21 जूनला पालखीचे प्रस्थान

Pune crime : मुलाला चावा घेतला म्हणून महिलेनं दोन कुत्र्यांना केलं ठार, एफआयआर दाखल

Pune Ravikant Varpe : ‘बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तरी आश्चर्य वाटणार नाही’

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.