एक नंबर भावा! तुझ्या कृतीनं माणुसकी जिवंत आहे, हे सिद्ध केलं! पाणी देणाऱ्याची कृती काळजाचं पाणी पाणी करणारी

Pune viral boy facebook post : गौरी देशपांडे यांनी लिहिलेही ही पोस्ट एक हजार पेक्षा जास्त लोकांनी शेअर केली आहे. तर 12 हजारपेक्षाही जास्त जणांनी या पोस्टला लाईक केलंय.

एक नंबर भावा! तुझ्या कृतीनं माणुसकी जिवंत आहे, हे सिद्ध केलं! पाणी देणाऱ्याची कृती काळजाचं पाणी पाणी करणारी
अनेक मराठी फेसबुक पेजवरुन सिद्धेशच्या कौतुकाची पोस्ट व्हायरलImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 8:17 PM

मुंबई : सिद्धेश गायकवाड या नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल (Social Media Viral) झाली आहे. आपल्या कृतीतून सिद्धेश गायकवाडनं सोशल मीडियामधील लोकांचं मन जिंकलंय. गौरी देशपांडे (Gauri Deshpande Facebook Post) नावाच्या एका मुलीनं फेसबुकवर सिद्धेश गायकवाडवर पोस्ट लिहिली. गौरी यांनी लिहिलेली ही पोस्ट अल्पावधीत व्हायरल झाली. अनेक मराठी फेसबुक पेजवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टवर असंख्य कमेन्ट्स पडल्या असून वाऱ्याच्या वेगानं ही पोस्ट व्हायरल होत आहेत. मुंबई-पुणे (Mumbai Pune Express Highway) प्रवासादरम्यान, आपल्याला आलेला अनुभव गौरी देशपांडे यांनी लिहून काढला आहे. या प्रवासादरम्यान, सिद्धेश गायकवाडची भेट गौरी यांना झाली. या भेटीत गौरी यांना आलेला अनुभव अनेकांच्या काळजाला हात घालून गेला आहे. नेमकं सिद्धेश गायकवाड यानं काय केलं? त्याच्यावर पोस्ट लिहावी असं गौरी देशपांडे यांना का वाटलं, याचा किस्साही इंटरेस्टिंग असाच आहे.

.. माणुसकी जिवंत आहे!

रविवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा फटका अनेक प्रवाशांना बसला. तासनतास लोक हायवेवर अडकून पडले होते. ऐन उन्हात झालेल्या वाहतूक कोंडीनं अनेकांना घामाघूम केलं होतं. याच वाहतूक कोंडी गौरी देशपांडेही अडकल्या होत्या. यावेळी त्यांना आपल्याला आलेला अनुभव शब्दबद्ध केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय, की…

काल सकाळी मुंबई पुणे हायवे वर chemical tanker पलटी झाल्यामुळे पूर्ण हायवे जाम होता. मी कामानिमित्त पुण्याहून मुंबईला निघाले होते. ३ तास traffic मध्ये एकच जागी अडकून पडल्यामुळे आता पुण्याला परत जाऊया असे ठरवत असतानाच एक दादा दिसला. सिद्धेश गायकवाड, गाव पांगोळी. अर्धा लिटर ची पाण्याची बाटली माझ्या समोर धरून ताई पाणी पाहिजे का ?. हो म्हणून बाटली घेतली आणि किती देऊ विचारले तर त्याने सांगितलं मी सगळ्यांना पाणी वाटत आहे. पैसे नको आहेत मला .. 4-5 तास झाले आहेत सगळे एकाच जागी अडकून पडले आहेत म्हणून मी free पाणी देत आहे सगळ्यांना. उन्हाळा वाढला आहे, लहान मुलं असतात सोबत घेतलेलं पाणी पण एवढ्या वेळात गरम होऊन गेलं असेल या सगळ्याचा विचार करून छोटासा सिद्धेश गायकवाड आणि त्याची बहीण असे दोघे जण हायवे वर अडकलेल्या सगळ्यांना पाण्याच्या बाटल्या वाटत होते. त्याला विचारलं एक फोटो घेऊ का रे तुझा तर नको कशाला उगीच ताई एवढंच म्हणाला. मग थोड्या गप्पा मारल्या नंतर तयार झाला . फेसबुक वर नाहीये हा दादा.. पण लोणावळा, पांगोळी चे कोणी त्याला ओळखणारे असतील तर नक्की त्याला कळवा.. viral करा.. Thank you सिद्धेश गायकवाड मला पण पाण्याची गरज होती. माझ्या जवळची पाण्याची बाटली संपली होती. आणि नेमका तेव्हाच हा पाणीवाला दादा भेटला. Thank you.. पैसे देऊन पण पाणी मिळेल असं दुकान सुध्दा आजूबाजूला नसताना बसल्या जागी मिळालेलं पाणी म्हणजे अमृत च वाटलं त्या वेळेला ..अशावेळी या जगात चांगली माणसं आहेत.. याचा प्रत्यय येतो

गौरी देशपांडे यांनी लिहिलेही ही पोस्ट एक हजार पेक्षा जास्त लोकांनी शेअर केली आहे. तर 12 हजारपेक्षाही जास्त जणांनी या पोस्टला लाईक केलंय. सिग्नलवर पोटापाण्यासाठी छोट्या-मोठ्या गोष्टी विकणारे, अनेकजण तुम्ही पाहिले असतील. याचवेळी पाण्याच्या बाटल्या विकणारेही पाहल्याचा अनुभव तुम्हाला आलेला असू शकेल. पण एका छोटाशा कृतीनं कुणाचीतरी खरंच मदत होईल, याचा एक सकारात्मक किरण सिद्धेश गायकवाडच्या निमित्तानं आज पुन्हा एकदा सगळ्यांना दिसून आला आहे.

संबंधित बातम्या :

Video | शेवटच्या घटका मोजत असलेला पक्षी पाहिला अन् माणुसकी जिवंत झाली, पाहा हृदयद्रावक व्हिडीओ

#HelpChain : मदत ‘अशी’ही, Viral video पाहून तुम्हीही म्हणाल, माणुसकी अजून जिवंत!

अपघात पाहताच थांबले, जखमी मुलाचा चेहरा रुमालाने पुसला, औरंगाबादेत डॉ. कराड यांनी दिला माणुसकीचा दाखला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.