Pimpri Chinchwad crime | भोंदू बाबाचा प्रताप ! घरावरील काळ्या जादूची भीती घालवण्यासाठी लाखो रुपये उकळत , महिलेसोबत केले ‘हे’ कृत्य

आरोपीने पीडित महिलेला काळ्या जादूची भीती दाखवता २० लाखरुपये खंडणी घेतली. त्यानंतर संबंधित महिलेला धमकी देत ठिकठिकाणी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याची माहितीही पीडित महिलेने पोलिसांना दिली आहे.

Pimpri Chinchwad crime | भोंदू बाबाचा प्रताप ! घरावरील काळ्या जादूची भीती घालवण्यासाठी लाखो रुपये उकळत , महिलेसोबत केले 'हे' कृत्य
Pimpri Chinchwad policeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 11:26 AM

पिंपरी – शहरात अंधश्रद्धेचा ( superstition) अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. तुमच्या घरावर काळी जादू झाली आहे. ती काळी जादू काढून टाकण्यासाठी पूजा करण्याची असल्याचे सांगत पूजा करावी लागणार आहे. त्यासाठी महिलेकडून 20 लाख रुपये घेतले. त्यानंतर संबंधित महिलेला गुंगीचे औषध देत बलात्कार(Rape case )  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किवळे, मारुंजी व औरंगाबाद जिल्ह्यात ऑक्टोबर 2020 ते 19 जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) भोंदू बाबाला अटक केली आहे. विनोद शंकर पवार (वय 33 , काळेवाडी) असे भोंदूबाबाचे नाव आहे. याबाबत पिडीत 38 वर्षीय महिलेने देहूरोड पोलिसात तक्रार दिली आहे.

असा झाला उलगडा

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेच्या कुटुंबात कौटुंबिक वाद सुरु होते. यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित महिलेने भोंदूबाबाकडं विचारणा केली. यावर त्या भोंदूबाबाने मला तुमच्या घरी येऊन बघावे लगेल असे सांगितले त्यानंतर आरोपी विनोद पवार पीडित महिलेच्या घरी गेला. तिथे त्याने तुमच्या घरावर काळी जादूनं केली आहे. त्यामुळे घरात कौटुंबिक कलह होत असल्याची माहिती दिली. ही काळी जादू डोईवर करण्यासाठी तुम्हाला पूजा करावी लागेल. त्यासाठी 30 हजार रुपये खर्च येईल सांगितले. त्याप्रमाणे पीडित महिलेने पूजाही केली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

काळ्या जादूची भीती दाखवत

त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला काळ्या जादूची भीती दाखवता २० लाखरुपये खंडणी घेतली. त्यानंतर संबंधित महिलेला धमकी देत ठिकठिकाणी घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याची माहितीही पीडित महिलेने पोलिसांना दिली आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, उपनिरीक्षक संगीता गोडे, सहायक फौजदार अशोक दुधवणे, पोलीस कर्मचारी किरण काटकर, प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, अमर राऊत, प्रदीप गायकवाड, प्रदीप गुट्टे, अनिता जाधव यांच्या पथकाने हे करवाई केली आहे.

अवकाळीचा कहर त्यात महावितरणची भर, शॉर्टसर्किटने ऊस जळून खाक, अशी मिळवा आर्थिक मदत..!

Pune : स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो झाली पाहिजे , अशी विनंती पंतप्रधानांकडे केली- अजित पवार

Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांची चाकूने भोसकून हत्या, बिहारमधील धक्कादायक घटना 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.