GOLD RATE | सोनं जळगावपेक्षा पुण्यात जवळपास साडे चारशे रुपयांनी महाग!
आज जळगावपेक्षा पुण्यात सोन्याचे दर अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील सोन्याचा दर प्रति तोळा 51 हजार 500 रुपये आहे. तर जळगावात सोने प्रतितोळा 51 हजार 37 रुपये आहे.
पुणे: तुम्ही सोने खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आज जळगावपेक्षा पुण्यात सोन्याचे दर अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील सोन्याचा आददार दर प्रति तोळा 51 हजार 500 रुपये आहे. तर जळगावात सोने प्रतितोळा 51 हजार 37 रुपये आहे. कोल्हापूरचा विचार केला तर आज सोन्याचा भाव 51 हजार 100 रुपये प्रति तोळा आहे. (Gold price is higher in Pune than in Jalgaon)
चांदीचा विचार केला तर मात्र पुण्यापेक्षा जळगावात चांदी खरेदी करणं स्वत: ठरेल. कारण, पुण्यात चांदीची किंमत प्रति किलो 65 हजार रुपये इतकी आहे. तर जळगावात चांदीला 67 हजार 506 रुपये प्रति किलो इतका दर आहे. तिकडे कोल्हापुरात चांदी 64 हजार रुपये प्रति किलो आजचा दर आहे.
मुंबईतील सोन्याचा दर
मुंबईतील सोने आणि चांदीच्या दराचा विचार केला तर मुंबई आज सोने प्रति तोळा 49 हजार 320 रुपये आहे. काल हेच सोनं 10 रुपयांनी स्वस्त होतं. गेल्या 10 दिवसातील मुंबईतील सोन्याचा दराचा विचार केला तर मुंबईत सोन्याच्या किमतीत चढउतार राहिला असला तरी फारसा फरक पडलेला दिसत नाही.
दिल्लीतील सोन्याची किंमत
दिल्लीचा विचार केला तर दिल्लीत सोनं महाराष्ट्रापेक्षा तुलनेनं महाग आहे. दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 52 हजार 760 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 48 हजार 360 रुपये प्रति तोळा आहे. गेल्या 10 दिवसांचा विचार केला तर दिल्लीत सोन्याचे दर 400 रुपयांनी कमी झाले आहेत.
ऑगस्टपासून सोनेदरात घसरण
भारतात सोन्याच्या किंमतीत ऑगस्ट महिन्यापासून प्रचंड घसरण झाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅम चक्क 56 हजार 379 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, आता हीच किंमत 50 हजारांच्या आसपास राहिली आहे. कोरोना लस आल्याच्या बातमीनंतर गुंतवणुकदारांना सोन्यापेक्षा शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी जास्त सुरक्षित असल्याचं वाटत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचा दर घसरला आहे. त्याचा परिणाम देशातील सराफ बाजारातही बघायला मिळत आहे
संबंधित बातम्या:
आनंदाची बातमी, सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण!
Gold Price | सोनं महागलं! पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव…
Gold price is higher in Pune than in Jalgaon