पिंपरी चिंचवड : पोलिसांनी ड्रोन जप्त करताच कुख्यात गुंड गजानन मारणेच्या (Goon Gajanan Marane) साथीदारांची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पळापळ झाली. मारणेचे साथीदार द्रुतगती महामार्गावर थांबून आरडाओरडा करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकाराचे ड्रोनने चित्रीकरण करत असल्याचं समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रोन जप्त केला. तेव्हा मारणेच्या साथीदारांची पळापळ सुरु झाली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Goon Gajanan Marane accomplices runs away after Police detains drone)
पुण्यातील दोन हत्या प्रकरणातून मुक्तता झाल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणेची तळोजा येथील कारागृहातून सुटका झाली होती. यावेळी मारणेने 300 गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणूक काढली. या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढणे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा असल्याचं देसाई म्हणाले.
गजानन मारणे सोमवारी कारागृहाबाहेर
कुख्यात गुंड गजानन मारणे सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून बाहेर आला. त्यावेळी कारागृहाबाहेर मोठ्या संख्येने त्याचे समर्थक जमले होते. गजानन मारणे याच्या सुटकेनंतर त्याच्या पिलावळीने एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केले. पिंपरी – चिंचवडच्या हद्दीतून सायंकाळी पुण्याच्या दिशेने मारणे आणि त्याच्या समर्थकांचा ताफा गेला.
कुख्यात गुंड गजानन मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. (Goon Gajanan Marane accomplices runs away after Police detains drone)
शंभुराज देसाई यांनी गजाजन मारणे मिरवणूक प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं. मिरवणुकीच्या व्हिडीओ क्लिप तपासल्या जाणार आहेत. बेकायदेशीर पद्धतीनं जमाव जमवला असेल तर चौकशीअंती त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. जेलमधून सुटून आल्यानंतर गजानन मारणेवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
गुंड गजाजन मारणे याच्यावर 2014 मधील दोन हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणी मारणे आणि समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी त्याला येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
कुख्यात गुंड गजानन मारणेविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल
(Goon Gajanan Marane accomplices runs away after Police detains drone)