Supriya Sule : सरकार तर पक्ष फोडण्यात व्यस्त, आता नवीन कॅबिनेट मंत्र्यांवर भिस्त, पुण्यातील नागरी समस्यांवरुन सुप्रिया सुळे यांनी काढला चिमटा
Supriya Sule Attack On Government : पावसाळ्याने राज्यात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक शहरातील विकास कामांचे पितळ उघड्यावर पडत आहे. पुण्यातील नागरी समस्यांवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारचे चांगलेच कान टोचले आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवार निशाणा साधला आहे तर पुण्याचे कॅबिनेट मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पण कानपिचक्या दिल्या आहेत. पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक शहरातील विकासाचे दावे किती पाण्यात आहेत, हे समोर आले आहेत. पुण्यातील नागरी समस्यांबाबत सुळे यांनी आवाज उठविला आहे. त्यांनी स्मार्ट सिटी योजनेवर टीकास्त्र सोडले आहे.
सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त
राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. त्यांनी बारामतीत लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर आसूड ओढला. पुण्यातील नागरी समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारकडे वेळ नसल्याचे सुचवत, आता पुण्यातील मंत्र्यांकडून हा प्रश्न मार्गी लागेल, असा चिमटा त्यांनी काढला.
पुण्यातील समस्यांचा वाचून दाखवला पाढा
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. कालच कॅबिनेट मंत्री मुरलीधर मोहोळ आणि सुप्रिया सुळे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी यांनी पुण्यातील अनेक नागरी समस्यांची जंत्रीच वाचून दाखवली.
पुणे शहरात मल्टिपल गोष्टी सुरू आहेत. गुन्हेगारी वाढत आहे. कष्टाने लोकं घरं घेतात, मात्र सर्व कोलमडलय, स्मार्ट सिटी म्हणून पुण्याला योजनेत घेतलं, या सगळ्या अतिक्रमणावर कारवाई करा. फार अपेक्षा होत्या, पण त्या फोल ठरल्याचे त्या म्हणाल्या.हडपसर परिसरात वाहनं फोडण्यात आली. पुणेकर टॅक्स भरतो, नागरिक मला जाब विचारतात.नाल्यांचं प्लनिग कुणी केलं, याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार आहे.स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा केला, त्याच काय झालं, असा रोखठोक सवाल त्यांनी राज्यासह केंद्र सरकारवर केला.
संघाने आत्मचिंतन करावे
मणिपूर हा देशाचा महत्वाचा भाग, तिथे रहाणारे भारतीय आहेत, पंतप्रधान शपथ घेतात, आणि दहशतवादी हल्ला होतो, मणिपूरबाबत एक शब्द काढला नाही.संघाच्या तो अंतर्गत प्रश्न आहे, ज्याने त्याने आत्मचिंतन करावे, असे त्या म्हणाल्या. अजित पवार काय बोलले माहिती नाही,मी रात्री उशिरा नगरहून पुण्यात आले बघितलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नीट परीक्षाबाबत पालक रडत होते, एवढ्या परीक्षा कशासाठी?, आमचं सरकार आल्यावर इतक्या परीक्षा कशासाठी अशी मागणी असणार, असे त्या म्हणाल्या. श्रीरंग बारणे अतिशय चांगले खासदार आहेत, त्यांच्या वेदना चांगल्या आहेत, त्यांच मत योग्य आहे, भाजप मित्र पक्षांशी कशी वागते हे त्यांना माहिती असल्याचा टोला त्यांनी लगावला.