Grapanchayat Election : ग्रामपंचायत पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, कधी मतदान, कधी निकाल? एका क्लिकवर

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा (By Election) कार्यक्रम जाहीर केला आहे. 5 जून रोजी मतदान तर 6 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तहसिलदारांनी निवडणूकीची नोटीस 5 मे 2022 (गुरुवार) प्रसिद्ध करावी, असेही सांगण्यात आले आहे.

Grapanchayat Election : ग्रामपंचायत पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, कधी मतदान, कधी निकाल? एका क्लिकवर
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील, रिक्तपदांसाठी 5 जूनला मतदानImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 7:55 PM

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील (Grapanchayat Election) निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा (By Election) कार्यक्रम जाहीर केला आहे. 5 जून रोजी मतदान तर 6 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तहसिलदारांनी निवडणूकीची नोटीस 5 मे 2022 (गुरुवार) प्रसिद्ध करावी, असेही सांगण्यात आले आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 13 मे ते 20 मे या कालावधीत 14 मे, 15 मे तसेच 16 मे ची सार्वजनिक सुटी वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या वेळेत सादर करता येणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होईल आणि छाननी संपेपर्यंत ही प्रक्रीया चालेल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 25 मे असून वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

कधी मतदान होणार?

मतदान 5 जून रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत राहील. मतमोजणी 6 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 9 जून 2022 पर्यंत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्हयात 222 ग्रामपंचायतीमधील एकूण 243 रिक्त जागेची पोट निवडणूक होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे. त्यामुळे काही प्रभागातील ग्रामपंचायचींच्या निवडणुकांचे बिगूल पुन्हा वाजले आहे. पुन्हा वॉर्डातलं राजकारण तापणार आहे. हे स्पष्ट झालं आहे. गावगाड्याच्या राजकारणात पुन्हा मोठ्या हलचाली पहायला मिळणार आहेत.

ग्रामपंचायत सर्वात प्रतीष्ठेची निवडणूक

ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वात जास्त प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीत चुरस सर्वात जास्त असते. ग्रामपंचायत ही गावगाड्याच्या राजकारणाचा एक मोठा अविभाज्य भाग आहे. संरपंच पद हे मानचे आणि प्रतिष्ठेचे पद मानले जाते. त्यामुळे विभागातील एका एका मताला मोठं महत्व प्राप्त होतं. त्यामुळे बडे राजकीय पक्ष आपलं संघटन तळागळातून मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायतींकडे मोर्चा वळवताना दिसून येतात. ज्याच्या जास्त ग्रामपंचायती तालुक्यात त्याचाच आमदार असे काहीसे समीरकरण असल्यानेही ग्रामपंचायतींच्या निवडणुकींंना मोठं महत्व असते. स्थानिक राजकारणवर पकड बनवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष ताकदीने उतरताना दिसून येतात. आता पुन्हा तो थरार पुन्हे जिल्ह्यातील मतदारांना अनुभवायला मिळणार आहे. प्रशासनही निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागले आहे. तशा हलचाली आता सुरू झाल्या आहेत. काही दिवसातच ही प्रक्रिया आता पूर्ण करून निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.