TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी प्रितिष देशमुखला जमीन मंजूर ; अटींचे करावे लागणार पालन
प्रितिष देशमुख घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी 22 डिसेंबर 2021 ला अटक केली होती. टीईटी परीक्षेसाठी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. याचाच फायदा घेत आरोपीने दलालाच्या मदतीने अपात्र उमेदवारांना पात्र केल्याच्या गैरव्यवहारात आढळून आले.
पुणे- शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील (TET Exam Scam)आरोपी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितिष देशमुख याला पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 50 हजाराच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. याबरोबरच देश सोडून कुठेही जाऊ नये व पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल ना करण्याच्या अटीवर जमीन मंजूर करण्यात आला आहे. टीईटी परीक्षा घोटाळा उघड झाल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) प्रितिष देशमुखची उचलबांगडी केली होती. त्यानंतर तपासामध्ये प्रितिष देशमुख (Pritish Deshmukh)घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी 22 डिसेंबर 2021 ला अटक केली होती. टीईटी परीक्षेसाठी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. याचाच फायदा घेत आरोपीने दलालाच्या मदतीने अपात्र उमेदवारांना पात्र केल्याच्या गैरव्यवहारात आढळून आले.
असा केला घोटाळा
टीईटी परीक्षेत दलालांच्या मार्फत आलेल्या बनावट विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोरे ओएमआर ठेवण्यास सांगितले जात. त्यानंतर ओएमआरमध्ये बदल करायचे यातून कोणी सुटून गेल्यास नापासला पास दाखवायचे. अशाप्रकारे जवळपास 500 अधिक विद्यार्थ्यांना पास करण्यात आल्याचे माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली होती.
या आरोपीचाही समावेश
टीईटी घोटाळ्यात ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितिष देशमुख. परीक्षा परिषदेचे प्रमुख सुखदेव डेरे, तुकाराम सुपे हे मुख्य आरोपी आहेत. पोलिसांना तपास करताना आढळून आलेल्या लॅपटॉपमधून माहिती मिळाली. त्यानंतर हा घोटाळा उघड झाला. पुणे पोलिसांनी या घोटाळ्याचा तपास आक करत असताना आतापर्यंत तुकाराम सुपे ,अश्विन कुमार,अभिषेक सावरिकर,सुखदेव डेरे ,सौरभ त्रिपाठी यांच्यासह आणखी एकाला अटक केली आहेत. याबरोबरच तुकाराम सुपेचे एकूण 3 कोटी 93 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख अश्विनकुमारच्या बंगलोरच्या घरातून 24 किलो चांदी, 2 किलो सोनं आणि काही हिरे पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. टीईटी घोटाळा प्रकरणात अंदाजे 900 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आहे.