Modi In Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी सोशल मीडियावर चालणार ‘हा’ ट्रेंड

दींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे. याच्याच निषेधार्थ राष्ट्रवादीने मोदींच्या दौऱ्याला विरोध करणारी बॅनरबाजी करण्यात आली होती. पोलिसांनी आंबेडकर पुतळ्याजवळ राष्ट्रवादीने लावलेले हे बॅनर उतरवले आहेत. या दरम्यान पोलीस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे.

Modi In Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी सोशल मीडियावर चालणार 'हा' ट्रेंड
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 9:45 AM

पुणे- पुणे मेट्रो ( (Pune metro)प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)आज शहरात येत आहेत. मात्र मोदींच्या या दौऱ्याला काँग्रेस ,राष्ट्रवादीकडून तीव्र विरोध केला जात आहे. शहर कॉंग्रेसच्या वतीने शहरात ठिकठिकाणी गो बॅक मोदी असा मजकूर असलेले काळे फलक लावण्यात आले असतानाच दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोदींच्या दौऱ्याला विरोध केला जात आहे.  मोदींचे पुण्यात आगमन झाल्यानंतर सोशल मीडियावर(Social  Media)  चालणार #गो बॅक मोदीचा ट्रेंड चालवण्यात येणार आहे. 10 ते 12 यावेळेत फेसबुक आणि ट्विटरवर #गो बॅक मोदी हा ट्रेंड चालवला जाणार आहे तप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पुणे येथील विमानतळावर पोहचतील. तिथं त्यांचा स्वागत समारंभ झाल्यानंतर ते पुणे महानगरपालिकेत उभारण्यातआलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी 11 वाजता पोहोचतील. त्यानंतर 11.30 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करून ते गरवारे स्टेशन पासून मेट्रोने प्रवास करणार आहेत. एमआयटी कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचं उद्घाटन झाल्यानंतर तिथं त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे.

निषेधाच्या बॅनरवरून पोलीस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

दुसरीकडे मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे. याच्याच निषेधार्थ राष्ट्रवादीने मोदींच्या दौऱ्याला विरोध करणारी बॅनरबाजी करण्यात आली होती. पोलिसांनी आंबेडकर पुतळ्याजवळ राष्ट्रवादीने लावलेले हे बॅनर उतरवले आहेत. या दरम्यान पोलीस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजपकडून प्रत्युत्तर

मोदींच्या विरोधात आंदोलनं करून प्रसिद्धी मिळवण्याचं काम काँग्रेसकडून केलं जात आहे असा टोला भाजपकडून काँग्रेस राष्ट्रवादीला देण्यात आला आहे. मोदींना घालण्यात येणाऱ्या फेट्याला विरोध करून काँग्रेस राजकारण करत आहे. काँग्रेसचे राजकारण पुणेकरांना चांगलं माहीत आहे,अशी टीका भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. फेट्याच्या विषयावर काँग्रेसने राजकारण करू नये , असेही ते म्हणाले आहेत .

आंदोलनासाठी अखेर परवानगी

पंतप्रधानांच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचा इशारा देत शहर कॉंग्रेसने आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. दरम्यान, घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार होते. पण, रात्री उशिरा हे स्थळ बदलण्यात आले. आता टिळक चौक म्हणजेच अलका टॉकीज चौकात हे आंदोलन करण्यात येणार आहे. पंतप्रधान हे महापालिकेतील कार्यक्रमानंतर जंगली महाराज रस्त्याने गरवारे मेट्रो स्थानकापर्यंत जाणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने झाशीच्या राणी पुतळा परिसरात आंदोलनात परवानगी मागितली होती. मात्र, ती परवानगी नाकारण्यात आली पाच वर्षे निष्क्रीय राहिल्याने महापालिका निवडणुकीत पराभव होण्याची भीती भाजपला वाटत आहे. पुण्यातील भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा ठरविला आहे. पण हा भाजपचा प्रयत्न केविलवाणा आहे. हा मेट्रो प्रकल्प 20 टक्केही पूर्ण झालेला नाही. तरीही त्याचे उद्‌घाटन पंतप्रधान मोदी करत आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेमुळे मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प लांबला आणि आता महापालिका निवडणूक जवळ आल्याने पंतप्रधानांना बोलावून कामाचा देखावा उभा केला जात आहे , अशी टीका प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

Nashik | घरांच्या किमती प्रति चौरस फूट 500 रुपयांनी महागणार; क्रेडाईचा निर्णय, कारण काय?

PM Modi आज Pune दौऱ्यावर ,मुख्यमंत्र्यांच्यावतीने Subhash Desai हजर राहणार

IND vs SL, 1st Test, Day 3, LIVE Score: मोहालीत श्रीलंकेचा डाव अडचणीत, आज फिरकी गोलंदाज वर्चस्व गाजवणार?

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.