Haribhau Rathod : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करणारी भाजपा नंबर एकची भ्रष्टवादी पार्टी! आपच्या हरिभाऊ राठोडांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, ते सामान्य जनतेला आवडलेले नाही. त्यांना बदल हवा आहे. त्यामुळे अनेकजण आपकडे आशेने पाहत आहेत, असे हरिभाऊ राठोड म्हणाले.

Haribhau Rathod : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करणारी भाजपा नंबर एकची भ्रष्टवादी पार्टी! आपच्या हरिभाऊ राठोडांचा हल्लाबोल
भाजपावर टीका करताना हरिभाऊ राठोडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 4:39 PM

पुणे : भारतीय जनता पार्टी (BJP) ही देशातली नंबर एक भ्रष्टाचारी पार्टी आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा सर्रासपणे गैरवापर भाजपा करत आहे. पंजाब आणि महाराष्ट्रात जे केले तेच दिल्लीत करण्यासाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप आपचे नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. देशातले एकूण वातावरण पाहता आम आदमी पार्टीची गरज आहे. आपच्या रुपाने एक सक्षम पर्याय मिळाला आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी जनतेची नस पकडली आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि पंजाब पॅटर्न आणला आहे. त्यामुळेच आम्ही मागील आठवड्यात त्यांची भेट घेत पक्षात प्रवेश केला आहे. आम्ही ओबीसीसाठी काम करतो. ओबीसींच्या विविध प्रश्नांवर केजरीवाल यांच्याशी आमची चर्चा झाली, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

‘आल्या आल्या गोंधळ घालण्यास सुरुवात’

आधीच्या म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने गोंधळ घातला. नव्या सरकारने तर आल्या आल्या गोंधळ घालत महाविकास आघाडीला मागे टाकले आहे. मुंबई महापालिकेची वॉर्ड रचना आणि आरक्षणावरून एवढा गोंधळ घातला आहे, की उमेदवाराला कळायला मार्ग नाही, माझा वॉर्ड महिलेसाठी आहे की पुरुषासाठी. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांनी याविषयी खोटे सांगितले, असा आरोप राठोड यांनी केला आहे.

‘सामान्य जनतेला आवडलेले नाही’

एकीकडे आम आदमी पार्टीची घोडदौड सुरू असताना 20 कोटींची ऑफर दिली जात आहे. महाराष्ट्रात तर 50 खोक्यांची चर्चा आहे. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, ते सामान्य जनतेला आवडलेले नाही. त्यांना बदल हवा आहे. त्यामुळे अनेकजण आपकडे आशेने पाहत आहेत, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले हरिभाऊ राठोड?

‘केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर’

देशात केंद्रीय यंत्रणांचा सर्रास वापर सुरू आहे. भाजपाचा एक नेता म्हणतो, राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्ष लागणारच नाही. म्हणजे कोर्ट काय निर्णय घेणार आहे, कोणाला अटक होणार आहे, हे यांना आधीच माहीत असते. ईडी, सीबीआयची कार्यालये कोण चालवते, तर ते भाजपा चालवतात, अशी टीका हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.