शनिवार, रविवारी या गडावर जाण्यापूर्वी हे फोटो पाहाच, मगच निर्णय घ्या

| Updated on: Jul 14, 2023 | 2:48 PM

Harishchandragad : सध्या वर्षापर्यटनाचा सीझन आलाय. चाकरमान्यांप्रमाणे युवक, युवती शनिवार, रविवारी पर्यटनासाठी या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे गड, किल्ले अन् धबधबे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

शनिवार, रविवारी या गडावर जाण्यापूर्वी हे फोटो पाहाच, मगच निर्णय घ्या
Harishchandragad
Follow us on

पुणे, दिनांक 14 जुलै 2023 : श्रावणास काही दिवसांत सुरुवात होणार आहे. निसर्गाने हिरवा शालू परिधान केला आहे. गड, किल्ले अन् धबधबे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. शनिवार, रविवारी मोठ्या संख्येने युवक, युवती पर्यटनासाठी बाहेर पडत आहे. वीकेंड साजरा करणाऱ्यांची मोठी गर्दी वर्षापर्यटनाच्या स्थळी होत आहे. यामुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प होणे, गड किल्ल्यांवर अडकून राहण्याचे प्रकार मागील आठवड्यात लोणावळा लोहगडावर घडला होता. परंतु आता पुणे अन् मुंबईजवळ असलेल्या या प्रसिद्ध किल्ल्यावर मोठी गर्दी होऊ लागली आहे. गर्दीचा हा फोटो पाहून तुमचे पर्यटनाचे नियोजन करा…अन्यथा पर्यटनाचा आनंदाऐवजी अडचणींना समोरे जावे लागले.

कुठे होत आहे गर्दी

पुणे, ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे मोठा पर्वत आहे. या पर्वतावर हरिश्चंद्रगड आहे. अहमदनगर जिल्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक हे शिखर आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन हा हरिश्चंद्रगड आहे. या गडाच्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण आहे. पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य अप्रतिम असते. त्यामुळेच या गडावर पर्यटक अन् तरुण-तरुणींची गर्दी होते. हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, कोकणकडा, तारामती शिखर याचा आनंद या ठिकाणी घेता येतो. गडावर प्राचीन लेणी आहेत. येथील शिवमंदिर १२व्या शतकापेक्षा जुने आहे.

नगर जिल्ह्यातील महाबळेश्वर

हरिश्चंद्रगडाला अहमदनगर जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हटले जाते. पर्यटकांचे आवडते ठिकाण हा गड आहे. अकोले तालुक्यात हा गड येते. पुण्यापासून हरिश्चंद्रगडाचे अंतर 96 किलोमीटर आहे. मुंबईवरुन 101 अंतरावर हरिश्चंद्रगड आहे. भंडरदरापासून फक्त १६ किलोमीटर गड आहे, तर नाशिकवरुन 67 किलोमीटर हा गड आहे. यामुळे नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटक वीकेंडसाठी या ठिकाणी येतात. परंतु शनिवार, रविवारी होणारी गर्दी पाहूनच पर्यटनाचे नियोजन करायला हवे.

हे सुद्धा वाचा

पौराणिक पार्श्वभूमी

हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. या ठिकाणावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड, भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्यांचे दर्शन होते.