कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तोल सुटला. चंद्रकांतदादांना काय बोलावं हे कळत नाही. त्यांना मस्ती आली आहे, असं धक्कादायक वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (hasan mushrif slams chandrakant patil over remarks on ajit pawar)
हसन मुश्रीफ यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे. दादांनी आधी छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांना तंबी दिली होती. हे बरोबर नाही. दादांवर आता चांगलं कार्टुन आलं आहे. आपलं हसं होऊ नये म्हणून दादांनी आता अशी वक्तव्य करणं टाळावं, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
आरोग्य सेवेच्या साहित्य खरेदीतील जीएसटी रद्द करा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादांनी केली आहे. त्यावर या मागणीचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने समिती तयार केली आहे. त्या समितीचे अध्यक्षपद मेघालय सारख्या छोट्या राज्याच्या अर्थ मंत्र्याला दिले. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र मोठं राज्य असताना असा अपमान का केला? केंद्र सरकार सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करत असते, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात झालेल्या तक्रारीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. परिवहनचे निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील याने अनिल परब यांच्या विरोधात तक्रार केली आहे. हा परमबीर सिंग यांचा दुसरा भाऊच दिसतो, असं सांगतानाच खाकी वेशातील हे दरोडेखोरच आहेत, अशी टीका त्यांनी केली.
आज सकाळी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली होती. अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा पाटील यांनी दिल आहे. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करून मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही, असे ते म्हणाले होते. (hasan mushrif slams chandrakant patil over remarks on ajit pawar)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 30 May 2021 https://t.co/xNC1Ipflzz #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 30, 2021
संबंधित बातम्या:
अजितदादा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल: चंद्रकांत पाटील
चंद्रकांतदादांना स्वप्ने बघण्याचा छंद, त्यावर काय बोलणार?; जयंत पाटलांची खोचक टीका
शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, अर्धा तास खलबतं; चर्चा मात्र गुलदस्त्यात
(hasan mushrif slams chandrakant patil over remarks on ajit pawar)