Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरीट सोमय्यांविरोधात कोल्हापुरात 25 हजार मुश्रीफ समर्थक आक्रमक; सोमय्यांचा दौरा वादळी ठरणार?

भाजप नेते किरीट सोमय्या उद्या कोल्हापूरला जाणार आहेत. त्यापूर्वीच त्यांना मुंबईतील त्यांच्या घरी स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे कोल्हापुरात 25 हजार मुश्रीफ समर्थक आक्रमक झाले आहेत. (hasan mushrif supporter challenge to kirit somaiya over his allegations)

किरीट सोमय्यांविरोधात कोल्हापुरात 25 हजार मुश्रीफ समर्थक आक्रमक; सोमय्यांचा दौरा वादळी ठरणार?
KIRIT SOMAIYA
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 5:27 PM

कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या उद्या कोल्हापूरला जाणार आहेत. त्यापूर्वीच त्यांना मुंबईतील त्यांच्या घरी स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे कोल्हापुरात 25 हजार मुश्रीफ समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे उद्या होणारा सोमय्यांचा दौरा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (hasan mushrif supporter challenge to kirit somaiya over his allegations)

किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापुरात जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोमय्या उद्या कोल्हापुरात जाणार आहे. सोमय्या यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांचे 25 हजार कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हे कार्यकर्ते उद्या कागलमध्ये एकवटणार आहेत.

सोमय्यांनी हिंमत असेलस तर सर्व कारखाना सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. त्यानंतरच त्यांनी पुढे जावं, असा इशारा मुश्रीफ समर्थकांनी दिला आहे. त्यामुळे सोमय्या यांचा उद्याचा हा दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

सोमय्यांना नोटीस

दरम्यान, सोमय्या उद्या कोल्हापुरात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस बजावून सोमय्यांना कोल्हापुरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

सोमय्या स्थानबद्ध

दरम्यान, सोमय्यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस पाठवल्यानंतर त्यांना मुंबईतील मुलुंड येथील घरात स्थानबद्ध करण्यात आलं आहे. त्यांच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जात आहे.

सोमय्या संतापले

मला जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. कोल्हापूर माझ्या घराच्या बाजूच्या गल्लीत नाही. मग मला घरातून बाहेर पडण्यास मज्जाव का केला जात आहे? असा सवाल सोमय्या यांनी पोलिसांना केला. या नोटीसमध्ये काहीच दम नसताना तुम्ही माझ्या घरात येण्याची हिंमतच कशी केली? असा सवालही त्यांनी केला आहे. दरवर्षी मी विसर्जनासाठी जात असतो. पण आज सकाळपासून पोलिसांनी घराबाहेर बंदोबस्त ठेवला आहे. ही दडपशाही आहे, असं सांगतानाच कितीही अडवलं तरी मी घराबाहेर पडणारच, असं त्यांनी सांगितलं. मला काय प्रतिबंध करायचा तो कोल्हापुरात करा, आता मला मुंबईत का अडवलं जात आहे? असा सवालही त्यांनी केला.

कोल्हापूरला जाणारच

मी उद्याच कोल्हापुरात जाऊन कारखान्याची पाहणी करणार होतो. पण त्यांनी कोल्हापूरला 144 लावली. त्यानंतर ठाकरे यांनी माझा दौरा प्रतिबंधित केला आहे. तसेच वळसे पाटील यांनीही माझ्या घरात पोलीस पाठवले आहेत. पण हे घोटाळेबाज सरकार आहे. काही झाले तरी मी कोल्हापूरला जाणारच, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारचा निषेध- फडणवीस

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. त्यांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करणं चुकीचं असल्याचं म्हटंलय. तसेच काहीही झालं तरी आमचा राज्य सरकारविरोधातील संर्घष सुरुच राहणार आहे, असं ठणकाऊन सांगितलंय. (hasan mushrif supporter challenge to kirit somaiya over his allegations)

संबंधित बातम्या:

किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध, कोल्हापुरात नो एन्ट्री; घराभोवती पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

Maharashtra News LIVE Update | किरीट सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्याआधीच राडा, सोमय्या यांच्या घरी पोहोचले पोलीस

सुखजिंदरसिंग रंधावा पंजाबचे नवे ‘सरदार’, मुख्यमंत्रीपदावर अखेर शिक्कामोर्तब?; थोड्याच वेळात अधिकृत घोषणा

(hasan mushrif supporter challenge to kirit somaiya over his allegations)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.