कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. सोमय्यांचे सर्व आरोप हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी भाजपात येण्याची मला ऑफर दिली होती. मी ही ऑफर नाकारली. त्यानंतरच माझ्यावर धाडसत्रं सुरू झालं, असं सांगतानाच सोमय्या माझ्यावर आज जे आरोप करत आहेत, त्याचे मास्टरमाइंड हे चंद्रकांत पाटीलच आहे, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे. (Hasan Mushrif to file Rs 150 crore defamation suit against Kirit somaiya)
हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांनाही आव्हान केलं. सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे. किरीट सोमय्या हे चुकीचे आरोप करत आहेत. किरीट सोमय्या यांची स्टंटबाजी कशासाठी? कोणाला विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे मास्टरमाइंड चंद्रकांत पाटील आहेत. पाटील यांच्या सांगण्यावरूनच ते माझ्यावर आरोप करत आहेत, असं मुश्रीफ म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण राष्ट्रवादी एके राष्ट्रवादी हे माझं ठरलं आहे. मी कुठेही येणार नाही, असं मी पाटील यांना सांगितलं होतं. त्यानंतर माझ्या कार्यालयावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या, असं सांगतानाच कोल्हापुरात भाजपचं काहीच अस्तित्व नाही. चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष असूनही त्यांना साधी जिल्हा परिषद जिंकता आली नाही. भाजप कोल्हापुरात नसल्यातच जमा असल्याचं शल्य त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी सोमय्यांच्या माध्यमातून माझ्यावर आरोप केला जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या आग्रहामुळेच मला आणि माझ्या कुटुंबांला बदनाम करण्यात येत आहे, असा दावाही त्यांनी केला.
सोमय्यांनी माझ्यावर आधी एका घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यामुळे मी त्यांच्यावर 100 कोटीचा दावा ठोकणार आहे. त्याची कागदपत्रं अंतिम टप्प्यात आहे. आता त्यांनी माझ्यावर नवा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आणखी 50 कोटींचा म्हणजे एकूण 150 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
सोमय्या आणि भाजपवाल्यांचं अति झालं आहे. त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही. रोज कुणावर ना कुणावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे आता आपल्याला त्यांचे घोटाळे बाहेर काढावे लागतील. त्याशिवाय ते सुतासारखे सरळ होणार नाही, असं मी आघाडीतील नेत्यांना सांगितलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. (Hasan Mushrif to file Rs 150 crore defamation suit against Kirit somaiya)
VIDEO : Fast News | महत्वाच्या बातम्या | 20 September 2021https://t.co/Ayaqym7mfn#FastNews #Mahafast100 #KiritSomaiya
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 20, 2021
संबंधित बातम्या:
सोमय्यांवरील कारवाई गृहमंत्रालयाकडून, मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही; संजय राऊतांचं मोठं विधान
Kirit Somaiya vs Hasan Mushrif Live : हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद
(Hasan Mushrif to file Rs 150 crore defamation suit against Kirit somaiya)