कुठे गारांचा पाऊस, तर कुठे सूर्य कोपला, ‘या’ दोन शहरात उष्णतेची लाट; हवामानाचा अंदाज काय?
राज्यात येत्या आठवड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे. तर काही ठिकाणी तापमानात प्रचंड वाढ होणार असल्याने उष्णता वाढणार आहे.
पुणे : नवी मुंबईत उष्माघातामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण अत्यवस्थ आहेत. नवी मुंबईतच नव्हे तर राज्यातील अनेक भागात सूर्य कोपला आहे. पुढील आठवड्यात तर राज्यात उष्णतेचा पारा अधिकच वाढणार आहे. या शिवाय राज्यातील काही भागात आजपासून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील आठवड्यातही राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसणार असल्याने उकाडा अधिकच वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्यामुळे उष्णता वाढत असल्याने घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
या आठवड्यात राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच उष्णता देखील वाढणार आहे. राज्यात आजपासून काही भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून राज्यातील अनेक भागात सकाळी कडक ऊन आणि दुपारी जोरदार पावसाचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात चालू आठवड्यात देखील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने दर्शवण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण अणि मराठवाड्यात पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात या आठवड्यात पावसाची शक्यता आहे.
नागपूर, पुण्यात सर्वाधिक उकाडा
राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेत मोठी वाढ होणार आहे. पुणे शहराचे तापमान देखील 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर नागपूरच तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, असं पुणए वेधशाळेतील हवामान शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी म्हटलं आहे.
आजचं तापमान
कल्याण-डोंबिवली
कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस किमान तापमान 30 डिग्री सेल्सिअस
इगतपुरी
कमाल तापमान 38 डिग्री सेल्सिअस किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस
पिंपरी चिंचवड
कमाल तापमान 37 डिग्री सेल्सिअस किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस
शिर्डी
कमाल तापमान 38 डिग्री सेल्सिअस किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस
मालेगाव
कमाल तापमान 41.2 डिग्री सेल्सिअस किमान तापमान 25.4 डिग्री सेल्सिअस