Pune Fire | पुण्यातील आगीत 15 घरे जळून खाक, आगीचे कारण अद्याप अस्पष्टच!
हडपसर, वैदुवाडी आणि रक्षकनगर भागामध्ये ही आग लागली होती. आगीमध्ये घरांचे मोठे नुकसान झाले असून रहिवाशांकडे अंगावरील कपड्याशिवाय काही राहिलं नाही. इतकेच नाहीतर वैदुवाडीतील एका कुटुंबातील मुलीचे लग्न तोंडावर असल्याने लग्नाशीसंबंध आणलेले सर्व साहित्य या आगीत जळून खाक झाल्याने कुटुंबावर दुख: चा डोंगर कोसळला आहे.
पुणे : पुण्यामध्ये (Pune) काल मध्यरात्री मोठी आगीची घटना घडलीयं. पुण्यातील रक्षकनगरमध्ये लागलेल्या आगीत तब्बल 15 घरे जळून खाक झालीत. या आगीत घरांचे मोठे नुकसान (Damage) झाले असून संसारोपयोगी वस्तू आगीत जळाल्या आहेत. मात्र, नेमकी आग कशाने लागली हे अध्याप कळू शकले नाहीयं. लवकरात लवकर मदत द्या अशी मागणी रहिवाशांनी प्रशासनाकडे केलीयं. बिराजदार झोपडपट्टीला ही आग (Fire) लागलीयं. येथे रहिवाश्यांची घरे चिटकून असल्याने पाहता पाहता 15 घरांना आग लागली.
हडपसर, वैदुवाडी आणि रक्षकनगर भागामधील घटना
हडपसर, वैदुवाडी आणि रक्षकनगर भागामध्ये ही आग लागली होती. आगीमध्ये घरांचे मोठे नुकसान झाले असून रहिवाशांकडे अंगावरील कपड्याशिवाय काही राहिलं नाही. इतकेच नाहीतर वैदुवाडीतील एका कुटुंबातील मुलीचे लग्न तोंडावर असल्याने लग्नाशीसंबंध आणलेले सर्व साहित्य या आगीत जळून खाक झाल्याने कुटुंबावर दुख: चा डोंगर कोसळला आहे. ही आग रात्रीच्या वेळी लागल्याने सुरूवातील रहिवाशांच्या लक्षात न आल्याने आगीने राैद्ररूप धारण केले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही.
संसारोपयोगी वस्तू आगीत जळून खाक झाल्या
यापूर्वीही पुण्यातील वैदुवाडी परिसरातील झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली होती. हडपसर परिसरातील झोपडपट्टीला आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीयं. दरवेळी रहिवाशांना मदतीचे आश्वासन प्रशासनाकडून मिळते. मात्र, म्हणावी तशी मदत देखील मिळत नाही. आगीमध्ये लोकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत आणि त्यांचा संसार रस्त्यावर आलायं. आगीची बातमी पुण्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि आग बघायला बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.