Pune rain : भोरमध्ये पावसाचं जोरदार पुनरागमन; ओढे, नाले तुडूंब! पुढच्या दोन दिवसांतही बरसणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज

राज्यातील चारही उपविभागांमध्ये 6 ऑगस्ट म्हणजेच आजपासून अतिवृष्टीचा इशाराही त्यांनी दिला होता. तर मागील दोन दिवसांपासून पुणे परिसरात संध्याकाळच्या वेळी मुसधार पाऊस हजेरी लावत आहे.

Pune rain : भोरमध्ये पावसाचं जोरदार पुनरागमन; ओढे, नाले तुडूंब! पुढच्या दोन दिवसांतही बरसणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज
भोरमध्ये झालेला मुसळधार पाऊसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 9:47 AM

पुणे : आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुण्यातल्या भोर तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. संध्याकाळच्या दरम्यान तासभर पडलेल्या मुसळधार पावसाने (Heavy rain) ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मागचे काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. ऊन पडत असल्याने पाण्याअभावी भात शेती पिवळी पडू लागली होती. त्यामुळे भात उप्तादक शेतकरी चिंतेत होते. मात्र पावसाच्या दमदार पुनरागमनानंतर शेतकरी (Farmers) वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मागील आठवडाभर पावसाने दडी मारली होती. दिवसाचे तापमानही वाढत होते. अधूनमधून हलक्या सरी कोसळत होत्या. या वाढत्या तापमानाचा (Temperature) भातशेतीवर मात्र परिणाम होत होता. त्यामुळे पावसाकडे येथील शेतकरी डोळे लावून बसला होता. अखेर काल मुसळधार पावसाने पुनरागमन केले. तर आणखी काही दिवस पाऊस बरसत राहणार आहे.

अजून बरसणार

हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा आधीच दिलेला आहे. 9 ऑगस्टपर्यंत सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश आणि मध्यम पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. दिवसाचे तापमान पुढील काही दिवसांमध्ये 32 अंश सेल्सिअसवरून 26 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर रात्रीचे तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असे हवामान विभागाचे अनुपम कश्यपी म्हणाले. राज्यातील चारही उपविभागांमध्ये 6 ऑगस्ट म्हणजेच आजपासून अतिवृष्टीचा इशाराही त्यांनी दिला होता. तर मागील दोन दिवसांपासून पुणे परिसरात संध्याकाळच्या वेळी मुसधार पाऊस हजेरी लावत आहे.

सासवडमध्ये झाला मुसळधार पाऊस

मागील दोन दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. पुरंदर तालुक्यातील सासवड शहर आणि परिसरात मुसळधार मागील दोन दिवसांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. एकाच दिवसात तब्बल 85 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे शेतात, रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दरम्यान, राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. साधारण 11 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

हे सुद्धा वाचा

भोर परिसरात झालेला पाऊस

राज्यात काय स्थिती?

विदर्भात 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बरसणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यासाठी 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे अनुपम कश्यपी म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.