राज्यपाल पदाची प्रतिष्ठा गमावलेले व्यक्ती म्हणजे कोश्यारी, ते नेहमीच संदर्भहीन का बोलतात…

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशातील सांस्कृतिक राजकीय धार्मिक सर्व क्षेत्रांना प्रेरणा देणारे महापुरुष आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांची तुलना जगामध्ये कुणाशीही होऊ शकत नाही.

राज्यपाल पदाची प्रतिष्ठा गमावलेले व्यक्ती म्हणजे कोश्यारी, ते नेहमीच संदर्भहीन का बोलतात...
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 4:48 PM

पुणेः राज्यपाल भगंतसिंह कोश्यारी आणि वादग्रस्त विधानं हे काही आता राज्यासाठी नवं राहिलं नाही. त्यांच्या अनेक वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत असते. मागे काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विधान करून त्यांनी वाद निर्माण केला होता. त्यानंतर त्यांनी आताही छत्रपती शिवाजी महाराज यांची नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याबरोबर तुलना करुन नवाच वाद निर्माण केला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण आता पुन्हा ढवळून निघाले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्याबदद् इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी जोरदार टीका केली नाही.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी बोलताना इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे म्हणाले की, माननीय राज्यपाल हे नेहमीच संदर्भहिन बोलतात, वादग्रस्त बोलतात आणि अपमानजनक बोलतात.

त्यामुळे राज्यात वादग्रस्त परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे हे राज्यपाल म्हणजे पदाची प्रतिष्ठा गमावलेले व्यक्ती आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

शरद पवार आणि नितीन गडकरी कर्तृत्ववान आहेतच त्याच्याबद्दल आदर्श आहेच मात्र त्यांची तुलना त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केली आहे.

त्यामुळे हे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतर व्यक्तींबरोबर तुलना केली असल्यानेच राज्यपालांनी महाराजांचा उपमर्द केला आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे इतिहास, वर्तमान आणि भविष्य काळालादेखील प्रेरणा देणारे महापुरुष आहेत. शिवाजी महाराज हे इतिहास जमा होणारे नाहीत उलट राज्यपालच इतिहा जमा होतील असंही सडेतोड मत व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशातील सांस्कृतिक राजकीय धार्मिक सर्व क्षेत्रांना प्रेरणा देणारे महापुरुष आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांची तुलना जगामध्ये कुणाशीही होऊ शकत नाही असं मतंही त्यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवरायांचे कार्य आणि कर्तृत्व हे जगविख्यात आहे. तसेच शरद पवार आणि नितीन गडकरी या दोघांनीदेखील कधी हट्ट धरला नाही किंवा ते कधी म्हणाले नाहीत की ते शिवाजी महाराजां एवढे आहेत.

तरीही जाणीवपूर्वक राज्यपाल असे विधान करतात आणि त्यामुळे वादाची ठिणगी पडते असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.