माझं बस्तान बसलं ते या धंद्यामुळे, अजित पवार यांनी सांगितलं

माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर या व्यवसायाने माझं बस्तान बसलं. तो व्यवसाय कोणता हे त्यांनी यावेळी सांगितलं.

माझं बस्तान बसलं ते या धंद्यामुळे, अजित पवार यांनी सांगितलं
अजित पवार
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 6:29 PM

बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार हे रोखठोक बोलतात. जे पोटात ते ओठात येते. जे केलं ते सांगतात. अजित पवार काल बारामतीत होते. त्यावेळी त्यांनी एका खासगी डेअरीचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी या व्यवसायातील आठवणी सांगितल्या. डेअरी व्यवसाय कसा आहे, हे त्यांनी सांगितलं. अजित पवार म्हणाले, माझ्या वडिलांचे निधन झाले.त्यानंतर व्यवसायाने माझं बस्तान बसलं. तो व्यवसाय कोणता हे त्यांनी यावेळी सांगितलं.

या व्यवसायाने बसले बस्तान

माझे वडील वारले. त्यानंतर माझं बस्तान बसले ते डेअरीमुळे. मी देखील दुधाचा धंदा करायचो, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार काल बारामतीतील खाजगी डेअरीच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे सुद्धा वाचा

एक गाय विकून जमीन घ्यायचो

वडील वारले त्यावेळी मी एक गाय साडेसात हजार रुपयाला विकायचो. एक एकर जमीन घ्यायचो. त्यावेळी जमिनीच्या किमती कमी होत्या, असं अजित पवार यांनी म्हंटलं. जमीन खरेदी करण्यासाठी पैसे गायीच्या विक्रीमधून व्हायची. असा हा डेअरी व्यवसाय आहे. तेव्हा जमिनीचे दर खूप कमी होते.

दुधावर असा होतो परिणाम

कष्ट घेतलं तर यश मिळतं. शेण पण भरपूर मिळते. गायी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. गायी-म्हशी हेल्दी आहेत. गायींना गाजर गवत खायला घातलं तर गायींचं दूध कडू लागतं. असा दुधावर परिणाम होतो. गायींचं दूध मशीनने काढलं जातं. म्हशींचं दूध काढण्यासाठी युपी, बिहारचे मजूर आणलेत.

गुणवत्ता असेल तर ग्राहक येतो

जमिनीचे दर कमी होते. तेव्हा उजनीच्या बॅकवॉटरला निंबाळकर यांनी जमीन घेतली. निंबाळकर यांची डेअरी उत्तम आहे. ते बायप्रोडक्ट तयार करतात. विक्री व्यवस्था केली आहे. सात दशकापासून निंबाळकर डेअरी सेवा देते. गुणवत्ता असेल, तर ग्राहक येतो, असं अजित पवार म्हणाले.

निंबाळकर डेअरीच्या माध्यमातून विविध पदार्थांची विक्री केली जाते. ४० लीटर दुधापासून त्यांनी विक्री सुरू केली होती. त्यानंतर २५ हजार लीटर दुधापर्यंत त्यांनी गोकुळ दुधाची विक्री केली. गोकुळमध्ये व्यवस्थापन बदललं. त्यामुळे गोकुळची डीलरशीप काढून घेण्यात आल्याची माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.