“माझं चुकलं, मी त्यावेळी सत्ता हाती घ्यायला पाहिजे होती;” अजित पवार यांनी सांगितलं
खरं तर माझं त्यावेळी चुकलं. मीपण पिंपरी चिंचवड मॉडेल दाखवून महाराष्ट्राची सत्ता हाती घ्यायला पाहिजे होती. पण, ते राहून गेलं. जे राहीलं ते इथं भरून काढू.
पुणे : चिंचवड येथील प्रचारसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, गेल्या काही वर्षात काहींना गुजरात मॉडेल दाखवून देशाची सत्ता हातात घेतली. असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांना लगावला. खरं तर माझं त्यावेळी चुकलं. मीपण पिंपरी चिंचवड मॉडेल दाखवून महाराष्ट्राची सत्ता हाती घ्यायला पाहिजे होती. पण, ते राहून गेलं. ते राहीलं ते इथं भरून काढू. इथं आपण स्मार्ट पिंपरी चिंचवडचं रोल मॉडेल भविष्यात चिंचवड विधानसभेत राबविण्यासाठी आम्ही जनतेसमोर आलोय. तेच आम्हाला भोसरी आणि पिंपरीमध्ये राबवायचं आहे. असा लोकप्रतिनिधी नानाच्या रुपानं उद्या पिंपरी चिंचवड विधानसभेला (Pimpri Chinchwad Legislative Assembly) लाभणार आहे. हा मुद्दा निवडणुकीच्या अजेंड्यावर वरच्या क्रमांकावर असला पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.
कुणीतरी जमिनी दिल्याशिवाय रस्ते होत नाही
अजित पवार म्हणाले, मी पालकमंत्री आणि अर्थमंत्री असताना कोरोना काळात पुणे जिल्ह्याला 850 कोटींचा निधी दिला. पुणेकर आज 21 टीएमसी पाणी पितात. वरसगाव शेतीचं पाणी पुण्याला द्याव लागतं. कुणाच्या तरी जमिनी घेतल्या नाहीतर रस्ते होत नाही. विमानतळ होत नाही. मी दर आठवड्याला मिटिंग घ्यायचो. प्रशासनाला कामाला लावायचो, याची आठवण अजित पवार यांनी करून दिली.
आताचे सत्ताधारी कामाकडे लक्ष देत नाही. वाहतूक कोंडीचा प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. हे सरकार मंत्रिमंडळ विस्तार करत नाही. महिलांना संधी देत नाहीत, असा आरोपही अजित पवार यांनी केला. हे घटनाबाह्य सरकार आहे. स्थगिती देणारं सरकार आहे. लोकांच्या कामाला स्थगिती देऊन काय केलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न
लोकप्रतिनिधी म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही. काहीजण जाणीवपूर्वक जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. धर्मात तेढ निर्माण करत असतात. राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातो.
मासे खाण्याच्या लायकीचे आहेत का?
शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींना सोबत घेतलं. आपण सर्वांनी एकदिलाने काम केलं पाहिजे. आपण सामाजिक भान ठेवलं पाहिजे. पुण्यातील नद्यांची वाईट अवस्था आहे. तेच पाणी धरणात जाते. उजनीचे मासे खाण्याचे लायकीचे आहे की नाही, हे बघायला पाहिजे. प्लास्टिकचा वापर करू नका प्रदूषण होणार नाही. याची खबरदारी घेतली पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.