तुम्हाला पोहचविल्यावरच मी जाणार, डॉक्टरांना शरद पवार यांचे प्रत्युत्तर, अजित पवारांनी किस्सा सांगितला
माझ्यादेखत शरद पवार यांनी आर. आर. पाटील यांना कँसर झाल्यानंतर फोन केला होता.
पुणे : पुण्यातील मावळमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार एका कार्यक्रमात बोलत होते. तळेगाव येथील एका रुग्णालयातील कार्यक्रमात उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, कधी कुणावर वेळ येईल, काही सांगता येत नाही. शरद पवार यांना 2004 मध्ये कँसर झाला. पण, ते मनानं हरले नाहीत. डॉक्टरांनी त्यांनी रुग्णालयात भरत होण्यास सांगितलं. तेव्हा शरद पवार हे रुग्णालयात भरती होण्यासाठी गेले. डॉक्टरांनी शरद पवार यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पवार यांनी डॉक्टरांना सांगितलं की, तुम्हाला पोहचविल्याशिवाय मी जाणार नाही, असा किस्सा अजित पवार यांनी आज सांगितला.
अजित पवार म्हणाले, कँसर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल व्हायचं होतं. तेव्हा शरद पवार म्हणाले होती, सेनापती नाही. ही निवडणूक तुम्हाला जिंकायची आहे. असं सागूंन शरद पवार ब्रीट कँडी हॉस्पिटलला अॅडमीट झाले.
माझ्यादेखत शरद पवार यांनी आर. आर. पाटील यांना कँसर झाल्यानंतर फोन केला होता. आपण वाटेल तो उपचार करू पण, तू खचू नको. पण, आर. आर. पाटील खचले. असे अनेक जण सोडून गेले. पण, 2004 आणि आता 2022 शरद पवार बरं झालेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
पहिली, दुसरी, तिसरी स्टेज असली तरी रिसर्च चालू आहेत. पण, आपण काही पत्थ्य पाळली पाहिजे. स्वतःची व समाजाची काळजी घेतली पाहिजे. आरोग्याच्या चांगल्या सवई लावल्या पाहिजे. निरोगी ठेवलं पाहिजे. आहार, विहार, विचार चांगले ठेवले पाहिजे. नियमित योगा केला पाहिजे. असंही अजित पवार यांनी सांगितलं.
हलका पोषक आहार घेतला पाहिजे. शरीर आणि मनावरचा ताण टाळला पाहिजे. असं केलं तर आपण अशा आजाराला दूर करू शकतो. जिभेवर कंट्रोल असलं पाहिजे. आजार टाळायचा असेल, तर आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारली पाहिजे, असंही ते म्हणाले.