कोट्यावधींची संपत्ती असताना पूजा खेडकर ओबीसी कोट्यातून अधिकारी कशा झाल्या?

IAS Pooja Khedkar Case Update : पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी एका मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. संपत्ती आणि आरक्षणाचा वापर यावर दिलीप खेडकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. वाचा सविस्तर...

कोट्यावधींची संपत्ती असताना पूजा खेडकर ओबीसी कोट्यातून अधिकारी कशा झाल्या?
पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेटImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 5:27 PM

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात वेगवेगळ्या अपडेट समोर येत आहे. यूपीएससीकडून पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलं आहे. मसूरीतील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमीमध्ये पूजा यांना पुन्हा बोलण्यात आलं आहे. वरिष्ठांच्या केबीनवर ताबा मिळवणं, कोट्यावधींची संपत्ती असताना ओबीसी कोट्यातून यूपीएससी परीक्षा पास होणं, दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आयएएसपद मिळवणं, असे गंभीर आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आले आहेत. या सगळ्यावर पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान दिलीप खेडकरांनी संपत्ती आणि आरक्षणाबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना उत्तर दिलं.

दिलीप खेडकर काय म्हणाले?

ओबीसीच्या निकषात ती बसते. त्यानुसारच पूजाला हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. आता या सगळ्या संदर्भात कमिटी नेमलेली आहे. ती कमिटी या गोष्टींचा अभ्यास करेन. जाणून बुजून हे असे आरोप केले जात आहेत. जर ती पात्र नसती तर तसं प्रमाणपत्रदेखील पूजाला मिळालं नसतं. त्यामुळे जे काही झालंय. ते नियमानुसार आहे. चौकशीतून हे सगळं खरं असल्याचं समोर येईल, असं दिलीप खेडकर यांनी म्हटलं आहे.

संपत्ती आणि उत्पन्न यात आपण गफलत करतोय. तुमचं उत्पन्न किती आहे. यावरून नॉन क्रिमीलेअर दाखला दिला जातो. एखाद्याला 2-5 एकर जमीन असेल. त्या जमिनीचा बाजारभाव पाहिला तर तो कोट्यालधींच्या घरात आहे. मग तिथं तुम्ही काय म्हणणार? मग त्याची ती संपत्ती आपण त्याचं उत्पन्न किती आहे हे पाहिलं पाहिजे, असं दिलीप खेडकरांनी सांगितलं.

नॉन क्रिमीलेअर दाखला कसा मिळाला?

पूजा वानखेडे हिचा नॉन क्रिमीलेअर दाखला हा नियमानुसारच काढलेला आहे. असं सांगितलं जात आहे की आमची कोट्यावधींची संपत्ती आहे. तर यामध्ये आमची वडिलोपार्जित किती संपत्ती आहे, वडिलांची संपत्ती किती आहे ते पण पाहा ना…. ती संपत्ती कितीला खरेदी केली तर ते बघा. त्या संपत्तीचा आताचा बाजार भाव पाहू नका. एखादी गोष्ट वाढवून सांगणं योग्य नाही, असं दिलीप खेडकर यांनी सांगितलं.

यूपीएससी परिक्षेत जर फक्त पैशांचाच वापर झाला असता तर श्रीमंतच या सिस्टिममध्ये आले असते. गरीब जर या सिस्टिममध्ये येत आहेत, श्रीमंत या सिस्टिमध्ये येत आहेत. पण तुमची श्रीमंतांची व्याख्या का आहे? जर एखाद्याचं पाच लाख उत्पन्न आहे आणि दुसऱ्याचं एक लाख आहे. तर पाच लाखांपेक्षा गरीब आहे. त्यामुळे शासनाने ठरवलंय की किती उत्पन्न असल्यानंतर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घेता येईल, असं दिलीप खेडकर म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.