पूजा खेडकर प्रकरणी वातावरण तापलं; थेट ‘या’ व्यक्तीच्या चौकशीची मागणी

| Updated on: Jul 16, 2024 | 3:25 PM

IAS Pooja Khedkar Case Update : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पूजा यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत युपीएससी परीक्षा पास झाल्या. मात्र त्यांच्या दिव्यांग असण्यावर आक्षेप घेतला जात आहे. वाचा सविस्तर...

पूजा खेडकर प्रकरणी वातावरण तापलं; थेट या व्यक्तीच्या चौकशीची मागणी
पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट
Image Credit source: tv9
Follow us on

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर यात सतत नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांची महानगर पालिका आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. वायसीएम रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. पूजा खेडकर यांचं आधीची सर्टिफिकेट्स नगरची आहेत. औंध रुग्णालयातून 23 ऑगस्ट 2022 या दिवशी औंध रुग्णालयात अर्ज केला. 24 ऑगस्ट 2022 ला पिंपरी- चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र मिळालं. हे कसं घडू शकतं? हा भाग वेगळा आहेय याची चौकशी व्हावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.

पूजा खेडकरांच्या चौकशीची मागणी

पूजा खेडकर यांना जे सर्टिफिकेट देण्यात आलंय. त्या व्यक्तीचा ओळखीचा पुरावा लागतो. ओळखपत्र लागतो. पण पूजा खेडकर यांनी रेशनकार्ड जोडलेलं आहे. तो पुरावा होऊ शकत नाही. ग्राह्य धरला जात नाही, हे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. पिंपरी- चिंचवड महानगर पालिका आयुक्तांनी योग्य ती काळजी न घेता कस सर्टिफिकेट दिलं याची चौकशी केली पाहिजे. तीन – तीन ठिकाणाहून अर्ज करता येत नाही. वेगवेगळा पत्ता दाखवला आहे. याची चौकशी व्हावी, असंही विजय कुंभार म्हणालेत.

“चौकशी करून त्वरित कारवाई करा”

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं यापूर्वी उघड झालं आहे. त्यानंतर पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयानेही त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं सोमवारी उघड झाले आहे. पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाण पत्राची सखोल उच्च स्तरीय चौकशी करून त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केली आहे.

शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असणारे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र धारक शोधून कडक कारवाई करण्यासाठी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री धनंजय मुंडे व दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना भेटणार असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.