इचलकरंजीत रस्ता सुरक्षा अभियान, बेवारस वाहने, हातगाड्या आणि जाहिरातींचे फलक जप्त

शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि नगरपरिषद यांच्यावतीने संयुक्त मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सहपोलीस निरिक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.

इचलकरंजीत रस्ता सुरक्षा अभियान, बेवारस वाहने, हातगाड्या आणि जाहिरातींचे फलक जप्त
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 2:44 PM

इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील विविध भागात अनेक वर्षांपासून रस्त्याकडेला धुळ खात (Abandoned Vehicles And Boards Seized) पडलेली बेवारस वाहने, हातगाड्या आणि जाहिरातींचे फलक रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोहीम राबवत शनिवारी जप्त करण्यात आले. त्यामध्ये 1 टाटा सुमो, 1 मारुती कार, 3 रिक्षा, 3 दुचाकी वाहने, 5 हातगाड्या आणि 55 फलकांचा समावेश आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि नगरपरिषद यांच्यावतीने संयुक्त मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सहपोलीस निरिक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली (Abandoned Vehicles And Boards Seized).

इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असल्याने येथील औद्योगिक पसारा मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने शहरात वाहनांची संख्या मोठी आहे. शिवाय, आसपासची शहरे, ग्रामीण भागातून आणि अन्य जिल्हे आणि राज्यातून शहरात ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे संपूर्ण भागात दैनंदिन दळणवळणाची वर्दळ सुरुच असते.

परंतु, शहरातील अनेक भागात अनेक वर्षांपासून रस्त्याच्या बाजुला धुळखात पडलेल्या बेवारस चारचाकी, तीनचाकी, दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. तसेच, दुकाने, हॉटेलसमोर रस्त्यावरच जाहिरातींसाठी लावलेल्या फलकांमुळेही रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होत आहे. या संदर्भात शहर वाहतुक नियंत्रण शाखा आणि इचलकरंजी नगरपरिषदेकडील अधिकारी आणि कर्मचारी यांनी शनिवारी संयुक्त मोहीम राबवली.

रस्त्याच्या बाजुला धुळखात पडलेली 1 टाटा सुमो, 1 मारुती कार, 3 रिक्षा, 3 दुचाकी अशी वाहने ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली. तसेच, 5 हातगाडे आणि रस्त्यावर जाहिरातींसाठी लावलेले 55 फलक जप्त करुन कारवाई करण्यात आली. यापुढेही ही मोहीम सुरु राहणार असून बेकायदेशीरपणे रस्त्याकडेला बेवारसपणे वाहन लावतील तसेच जाहिरातींसाठी फलक लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यास संबंधिता विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मोरे यांनी सांगितले (Abandoned Vehicles And Boards Seized).

Abandoned Vehicles And Boards Seized

संबंधित बातम्या :

इचलकरंजीत इंधन दरवाढ विरोधात मनसे आक्रमक, तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.