इचलकरंजीत मनसेच्या पाठपुराव्याने 50 सफाई कर्मचाऱ्यांना न्याय

इचलकरंजीत मनसेच्या पाठपुराव्याने 50 सफाई कर्मचाऱ्यांना राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी न्याय दिला.

इचलकरंजीत मनसेच्या पाठपुराव्याने 50 सफाई कर्मचाऱ्यांना न्याय
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 4:38 PM

इचलकरंजी :  शहरातील आयजीएम रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन हॉस्पिटलच्या ठेकेदाराविरोधात तक्रार केली होती. यामध्ये मनसेची त्यांना भक्कम साथ मिळाली होती. आता राज्यमंत्री यड्रावकर यांनी कर्मचाऱ्यांची समस्येची दखल घेऊन 50 कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिलाय. कर्मचाऱ्यांचा आवाज मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात टीव्ही 9 ने देखील महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे सफाई कर्मचारी आणि मनसेने टीव्ही 9 चे आभार मानले आहेत. (Ichalkaranjit Minister of State Rajendra Patil Yadravkar gave justice to 50 cleaning workers)

इचलकरंजीत आयजीएम हॉस्पिटल कोव्हिड-19 काळामध्ये सर्वसामान्य जनतेचा आधार बनले होते. याठिकाणी पाच हजार रुग्णांनी कोरोना सारख्या महामारीवर मात केली आहे. मार्चपासून कोरोना चा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत चालला होता. यावेळी रुग्णालयांमध्ये डॉक्टर, सिस्टर व सफाई कर्मचारी यांची कमतरता होती. यावेळी राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट बेसवर रुग्णालयामध्ये स्टाफ भरून घेतला होता. त्यानुसार इचलकरंजी शहरातील आयजीएम रुग्णालयात देखील सुमारे 72 सफाई कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्यात आली होती.

जिल्हा परिषदेच्या एका मतदानाद्वारे ही भरती करून घेण्यात आली होती. कोरोनाच्या काळामध्ये यांनी जीवाची पर्वा न करता आयजीएम रुग्णालय स्वच्छ व सुंदर ठेवले. त्या काळात त्या कर्मचाऱ्यांना बावीस दिवसाचा पगार दिला जात होता व आठ दिवसांचा पगार कट केला जात होता. शिवाय कर्मचाऱ्यांचा कोणताही विमा सुरक्षा कवच नव्हते. पुरुषांना प्रतिदिन तीनशे रुपये तर महिलांना अडीशे रुपये असा पगार देण्यात येत होता. ज्यादा ड्युटीचा पगार देखील ठेकेदार देत नव्हता. अशा सर्व तक्रारी घेऊन मनसेचं शिष्टमंडळ आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते.

त्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून मनसेच्या वतीने याचा पाठपुरावा केला जात होता. या तक्रारीची दखल घेऊन आरोग्यमंत्री यड्रावकर यांनी राज्यातील कोरोना काळामध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी काम केले आहे त्यांचा राहिलेला पगार देण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत.

यावेळी टीव्ही 9 च्या माध्यमातून आम्ही गेल्या पंधरा दिवसांपासून पाठपुरावा करत होतो आणि आज आम्हाला न्याय मिळाला. यानिमित्ताने आम्हाला टीव्ही 9 ची खंबीर साथ मिळाली, असे उद्गार मनसे जिल्हाध्यक्ष रवी गोंदकर यांनी काढले. तसंच कर्मचाऱ्यांनीही टीव्ही 9 चे आभार मानले. (Ichalkaranjit Minister of State Rajendra Patil Yadravkar gave justice to 50 cleaning workers)

हे ही वाचा

हातकणंगले पंचायत समिती सभापतींच्याविरोधात अविश्वास ठराव, काय होणार?

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाजी, दुचाक्या ढकलत निषेध

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.