पुणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर कणखरपणा दाखवला नसता तर आपण जगातल्या 60 देशांना लस पुरवली नसती, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं आहे. जगातल्या 60 देशांना आपण लस पुरवली, याला कारणीभूत मोदींचं कणखर नेतृत्व आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुण्यात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या वतीनं स्वच्छता कर्मचारी तसेच वृत्तपत्र वितारकांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात केलेल्या कामाची पावती म्हणून दिवाळी निमित्त हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना फराळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी केलेल्या भाषणात चंद्रकांत पाटील म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी कणखरपणा दाखवला नसता तर आपला देश 60 देशांना लस पुरवू शकला नसता. कधीकाळी बाहेरच्या देशातून आपल्याला लाल गहू आणावा लागला होता, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.
नवाब मलिकांनी या एजन्सीच्या कामकाजात पडू नये. वानखेडेंकडून तपास काढला का नाही यात त्यांनी का पडावं. एजन्सीचं काम एजन्सीला करु द्यावं, असा टोला चंद्रकांतदादांनी मलिकांना लगावला. आर्यन खान प्रकरणी बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले, “या सगळ्याची सुरुवात नवाब मलिकांनी केली. फार काळ आम्ही शांत बसलो तर आम्हालाही हे मान्य आहे असा त्याचा अर्थ निघतो, म्हणून आम्ही बोललो”
नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असावा बहुतेक कारण सत्तेत अशताना ट्विटच्या माध्यमातून ते विविध प्रकारच्या मागण्या करु लागलेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
पेट्रोल डिझेल दर कपातीवर बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. नाचता येईना अंगण वाकडे, अशी राज्य सरकारची स्थिती आहे. १४ राज्यांनी दर कमी केलेत.आता तुम्हीही कमी करा. प्रत्येक वेळी केंद्रावर का ढकलता?, असा सवाल चंद्रकांतदादांनी केला.
(If Modi had not shown toughness, we would not have vaccinated 60 countries Says Chandrakant patil)
हे ही वाचा :
नवाब मलिकांकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती, भंगारवाला करोडपती कसा झाला?; मोहित भारतीय यांचा सवाल