पुणे : गोखले नगर (Gokhale Nagar) येथील भांबुर्डा पोलीस लाइनसमोर (Police line) मोठ्या प्रमाणात वृक्षतोड (Tree cutting)करण्यात आली आहे. सेनापती बापट रोड येथे रोहन तपोवन सोसायटीच्या बाजूलाच ही वृक्षतोड करण्यात आली आहे. या जागेची हद्द ही पुणे महानगरपालिकेत येते. परंतू जागेच्या बाजूलाच फॉरेस्ट डिपार्टमेंटचे महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यालय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड होताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे काय आले नाही, असा सवाल पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहेत. तर इथे गेटवर वॉचमनसुद्धा असतात. असे असताना त्या वॉचमॅनने या बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या गाडीला आतमध्ये कसे काय जाऊ दिले, असा सवाल आता विचारला जात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता निलेश प्रकाश निकम यांनी यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
गोखले नगरातील रोहन तपोवन सोसायटीच्या बाजूला झालेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमी नागरिक सध्या संतप्त आहेत. वृक्षतोड होत असताना कुणीच कसा आक्षेप घेत नाही, असा सवाल विचारला जात आहे. येथील वॉचमननच्या कसे लक्षात आले नाही किंवा गाड्यांना त्याने आत कसे जाऊ दिले, असा सवाल निकम यांनी केला आहे. वृक्षतोड झाल्यानंतर त्या गाडीला राखीव वनक्षेत्राच्या रोडमधून अथवा हद्दीमधून बाहेर पडता कसे आले ही कमालीची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.
#Pune : गोखले नगर येथील भांबुर्डा वनविभाग हद्दीत बेकायदा वृक्षतोड करण्यात आलीय. महापालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालं असून पर्यावरणप्रेमींनी कारवाईची मागणी केलीय.#treecutting #crime #Video #illegal @PMCPune
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/NL335wQH6f— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2022
रोहन तपोवन सोसायटीला पुणे महानगरपालिकेच्या मंजूर नकाशानुसार पुणे दुसरा रोड दाखवून मंजूर करण्यात आला आहे. सोसायटीचे सर्व लोक फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या राखीव वनरोडचा वापर करत आहेत. यामध्ये उपवन रक्षक वनविभाग पुणे यांचे कार्यालय यात कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेत नसून यावर कोणीही बोलायला तयार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी या जागेची योग्यप्रकारे पाहणी करावी व झाड तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहेत.